9.2 C
New York
Friday, October 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

आश्वी खुर्दच्या प्रवरा इंग्लिश मिडियम स्कूलच्या वार्षिक सम्मेलतातून गड किल्लाच्या इतीहासाचा जागर

आश्वी दि.२३( जनताआवाज वृत्तसेवा):- लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा इंग्लिश मिडियम स्कूल चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून शिवकालीन गड किल्लाचा इतिहास सादर करत चिमुकल्यांनी शिवछञपतीच्या कार्याचा जागर करत सर्वाची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री. अण्णासाहेब भोसले पाटील होते.डाॅ. विखे पाटील कारखान्याचे संचालक डॉ. दिनकरराव गायकवाड पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ.कांचनताई मांढरे ,प्रा. दाभाडे आणि इतर पालक वर्ग उपस्थित होते

यावेळी प्रास्ताविकामध्ये शाळेच्या प्रगतीबद्दल माहिती प्राचार्य एस.टी.शेळके सर यांनी दिली. तसेच शालेय उपक्रम अंतर्गत विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी बालकलाकारांचे कौतुक व अभिनंदन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी “गड किल्ले आणि संस्कृती” या विषयावर विविध कलागुण सादर केले. .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.म्हसे उपासना यांनी केले.त्याचबरोबर आभार प्रदर्शन सौ. वनिता तांबे यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!