लोणी दि.२५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावते विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपावी आणि ग्रामस्वच्छतेच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणीताई निघूते पाटील यांनी केले.
औरंगपूर (ता. संगमनेर ) येथे पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या रासेयो शिबीर समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी विजय सावळीराम डेंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिबिरार्थिनीं केलेल्या ग्रामस्वछता तसेच वृक्षारोपण उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.राष्ट्रीय सेवा योजनेत आपण जीवन कौशल्य शिकतो, अनुशासन आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकायला मिळाली असे प्रतिपादन उपप्राचार्य भाऊसाहेब रणपिसे यांनी केले. या शिबिरासाठी प्राचार्य डॉ प्रदीप दिघे यांचे मार्गदर्शन तसेंच कॅम्पस डायरेक्टर डॉ राम पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
प्रारंभी रासेयोचे प्रमुख डॉ.बाळासाहेब मुंढे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.भाऊसाहेब रणपिसे, उपप्राचार्या सौ छाया गलांडे , सरपंच सौ लक्ष्मीताई भाऊसाहेब वाकचौरे,उपसरपंच पद्माताई डोळे, श्री बाळासाहेब गिरी, तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्ताञय तळोले, सोसायटीचे अध्यक्ष अशोकडेंगळे, उपाध्यक्ष राजेंद्र तळोले आदी उपस्थित होते.
शिबीर यशस्वीतेसाठी डॉ. एस. आर.लामखेडे, डॉ.डी.एस.तांबे, प्रा.पी.एल. हराळे,डॉ. एस. आर. सुसर, प्रा. एस.एस. शेख, प्रा.डी.एस. औटे, प्रा.एस. एस. लोखंडे, प्रा.डॉ. एस. आर. गाढवे, प्रा वाय बी खर्डे यांनी प्रयत्न केले.सुत्रसंचलन प्रा. सुरभी भालेराव यांनी केले.आभार प्रा. डॉ. विजय खर्डे यांनी मानले.




