राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ):- विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा गैरवापर करू नये चुकीच्या पद्धतीने फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप याचा वापर केल्यास त्या विद्यार्थ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल तसेच पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवाजे असे आव़ाहन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयास सदिच्छा भेटी प्रसंगी ते बोलत होते
आजच्या काळात विद्यार्थिनींचे पळून जाण्याचे प्रमाण जास्त घडत आहे याला जबाबदार फक्त शिक्षक आणि प्रशासन जबाबदार नसून पालकांनी ही पण पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे विद्यार्थ्यांना वाहन चालक परवाना नसल्यास योग्य दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता वेताळ यांनी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर योग्य तऱ्हेने केला जावा असे आवाहन त्यांनी केले आहे यावेळी पोलीस उपनिरीक्षक समाधान पडवळ तसेच पोलीस कॉन्स्टेबल अशोक शिंदे श्री ढाकणे महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते




