नगर( जनता आवाज वृत्तसेवा ):- अहमदनगर महाविद्यालय अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ , मा . गांधी अभ्यासकेंद्र आणि राज्यशास्त्र विभागाद्वारे राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला . २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो .कारण २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. भारतात निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस २०११ पासून राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो .
हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे नव मतदारांना नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे .तसेच नवमतदारांचा मतदान प्रक्रिये मधील सहभाग वाढवावा म्हणून त्यांना जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो . यामध्ये नवमतदारांचा सत्कार व त्यांना ओळखपत्र दिले जाते . तसेच लोकशाही संवर्धनासाठी मतदारांनी जात, धर्म ,भाषा आणि प्रांत या आधारावर मतदान न करता लोकशाही तत्वाचे पालन करण्याऱ्या घटकांना मतदान केले जावे असा अग्रह धरण्यात आला .तसेच दरवर्षी निवडक आयोग यासाठी एक घोष वाक्य देते वर्षासाठी ते Nothing like Voting ,I Vote for sure याचे मराठी रुपांतर ‘मी खात्री पूर्वक मतदान करण्या सारखे काही नाही’ हे होतो .
यावेळी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला , भिंतीपत्रक , विडंबन काव्य आणि घोषवाक्य स्पर्धाचे आयोजन करून नवमतदारात जनजागृतीसाठीचा प्रयत्न अहमदनगर महाविद्यालयात करण्यात आला. त्यासाठी वरील विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले . तसेच या कार्यक्रमात विद्यार्थी मतदारांना प्रतिज्ञा देण्यात आली. अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर .जे . बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा .डॉ . नोएल पारगे उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ. विलास नाबदे यांनी केले तसेच मतदारांना प्रतिज्ञा देण्याचे काम प्रा .डॉ . भागवत परकाळ (विद्यार्थी विकास अधिकारी )यांनी केले . तर आभार प्रा.अजय बनसोडे यांनी मानले , हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सचिन बोरुडे, प्रा. प्रतीक्षा दुधाडे यांनी परिश्रम घेतले .




