13 C
New York
Monday, October 27, 2025

Buy now

spot_img
spot_img

वाघाचा आखाडा ग्रामपंचायतीला सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल – आ.प्राजक्त तनपुरे

राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा यापूर्वी तांदुळवाडी ग्रुप ग्रामपंचायती मध्ये असल्याने वाघाचा आखाड्यावर सातत्याने अन्याय होत असल्याची भावना, निधी मिळत नसल्याने वाघाचा आखाडा स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने आता या ग्रामपंचायतीला शासनाचे सर्व निधी सवलतींचा लाभ होणार असून वाघाचा आखाड्याचा विकास निश्चित होईल त्यासाठी आपणास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

वाघाचा आखाडा येथे ११ कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा प्रसंगी आमदार तनपुरे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ लीलाबाई तनपुरे होत्या. यावेळी टाकळीमियाच्या सरपंच सौ लीलाबाई गायकवाड,उपसरपंच प्रशांत सप्रे,सदस्य रोहिणी सप्रे,सुरेश निमसे, गंगाधर तनपुरे, उत्तमराव दौंड, गणपतराव पटारे,नारायण कटारे, सुभाष वाघ, राजेंद्र सप्रे, आदि प्रमुख उपस्थित होते.

आमदार प्राजक्त तनपुरे आपल्या भाषणात म्हणाले की तांदुळवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी वाघाचा आखाडा स्वतंत्र ग्रामपंचायतीचा अध्यादेश निघणे गरजेचे होते. यासाठी आदिनाथ तनपुरे व त्यांचे सहकारी त्यावेळी विधानसभा अधिवेशन काळात तळ ठोकून होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी मंत्री असल्याने याबाबत यासाठी प्रयत्नशील होतो नगरचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील ओएसडी होते. त्यांची त्यावेळी मोठी मदत झाली आणी तांदुळवाडी ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होण्याच्या आधी २ दिवस वाघाचा आखाडा स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्याचा अध्यादेश निघाला. वाघाचा आखाड्याचे विकासाचे दार खुले झाले. यापुढे या ग्रामपंचायतीस शासनाचा१५ वित्त आयोगाचा निधी सह शासनाचे इतर निधी सोयी सवलती मिळणार असून त्यासाठी गावाने एकदिलाने एकविचाराने राहून जास्तीत जास्त निधी मिळवावा. त्यासाठी माझे सहकार्य आहेच, वाघाचा आखाडा येथील सर्व नागरिकांनी आज पर्यंत आमच्या कुटुंबावर प्रेम साथ दिली आहे अशीच साथ यापुढे द्यावी.राहुरी, वाघाचा आखाडा ते टाकळीमियाँ या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत ९ कोटी रुपयाचा असून या रस्त्यावरून ७ गावाची वाहतूक होणार असल्याने रस्त्याचे काम दर्जेदार करण्याचे आवाहन करून रस्त्यावरील कामासाठी वापरण्यात येणारे मटेरिअल चांगल्या दर्जाचे असावे ते निकृष्ट वापरू नये अशी तंबी ठेकेदारास दिली.

राहुरी तालुक्यातील ३० किलोमीटरच्या प्रमुख रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा २ मधून घेतले होते ही योजना महाविकास आघाडी सरकारने मंजूर केल्याने राहुरी वाघाचा आखाडा टाकळी रस्त्याचे काम तत्कालीन पालक मंत्री हसन मुश्रीफ यांच्या काळात मंजूर झाले होते त्याच्या सर्व मंजुरी प्रक्रिया आघाडी सरकारच्या काळात झाल्या पण दरम्यानच्या काळात आघाडी सरकार गेले व महायुतीचे सरकार येताच आमच्या काळातील सर्व मंजूर कामाना स्थगिती दिली त्याविरुद्ध न्यायालयाचे दरवाजे ठोठावले व ही स्थगिती उठवली.५ वर्षात तालुक्यातील १०० किलोमीटरचे रस्त्याचे काम होणे अपेक्षित होते. पण याकाळात अवघे २५ किलोमीटरचे काम सुद्धा पूर्ण झाली नाहीत असे आमदार तनपुरे यांनी सांगितले.

यावेळी किशोर दौंड,यांनी प्रास्ताविक तर धनंजय सप्रे यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला शरद धसाळ,अशोक सप्रे, संतोष कटारे, बाळासाहेब तनपुरे, मधुकर धसाळ, बी जी तनपुरे सर, गोरक्षनाथ धसाळ, गोरक्षनाथ कटारे,भालचंद्र सप्रे, सतीशवाघ,देवराव माळी अशोक वाघ शरद तनपुरे आदि उपस्थित होते. अशोक सप्रे यांनी आभार मानले.

यावेळी गावाची नात साक्षी दत्तात्रय कोळसे हिची रायगड जिल्ह्यात तलाठी यापदावर निवड झाले बद्दल तिचा आमदार तनपुरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!