26 C
New York
Thursday, August 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रवरा बँकेचा कारभार लोकाभिमुख करू :- डॉ. खर्डे

कोल्हार ( जनता आवाज
वृत्तसेवा  ) :- प्रवरा सहकारी बँकेच्या ग्राहकांचा बँकेवर पूर्ण विश्वास असून तो आणखी दृढ करण्यासाठी भविष्यकाळात प्रयत्न केले जातील. महसूल, दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचा कारभार आणखी लोकाभिमुख करू असा निर्धार प्रवरा सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे यांनी व्यक्त केला.
प्रवरा सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले. बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा डॉ. भास्करराव खर्डे यांच्याकडे सोपविण्यात आली. बँकेचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 
डॉ. खर्डे म्हणाले, ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी माझ्यावर विश्वास दर्शवित प्रवरा बँकेच्या चेअरमनपदाची जबाबदारी दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी दर्शविलेला विश्वास सार्थ ठरविण्याकामी प्रयत्नशील राहू.
 प्रवरा बँक ही महाराष्ट्रातील नामांकित व अग्रगण्य शेड्युल बँक आहे. तिच्या वैभवात भर पडेल व बँकेची उत्तरोत्तर प्रगती होईल असाच कारभार माझ्यासह व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून राहील.
स्वर्गीय पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांना गोरगरिबांना मदत करणे अभिप्रेत होते. त्या अनुषंगाने शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्ग व सर्वसामान्य लोकांना पूर्वीप्रमाणेच जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे धोरण बँकेचे राहील हा विश्वास डॉ. भास्करराव खर्डे यांनी व्यक्त केला.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!