नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):-नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील भारतीय जनता पक्ष भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब फुलमाळी यांच्यासह उत्तम फुलमाळी,साहेबराव फुलमाळी,साहेबराव इंगळे,लक्ष्मण इंगळे, तात्यासाहेब फुलमाळी ,सुभाष फुलमाळी,रमेश फुलमाळी ,लक्ष्मण फुलमाळी ,सेनाप्पा फुलमाळी,राजू फुलमाळी ,दत्तू शिंदे,शिनाप्पा फुलमाळी,मुसल्या फुलमाळी,बाबू फुलमाळी, श्यामराव फुलमाळी,साहेबराव इंगळे यांनी आ शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी मा सरपंच संतोष म्हस्के,सरपंच महेश म्हस्के,ग्राम प सदस्य महेश उगले,सुरेश मिसाळ आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना बाळासाहेब फुलमाळी म्हणाले नेवासा तालुक्यासह जिल्हा भरात भारतीय जनता पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले भारतीय जनता पक्षाचे विचार भकट्या विमुक्त बांधवांच्या घरा,घरात पोहचवले.पक्ष वाढीसाठी अतोनात मेहनत केली
स्वतःचा कुठलाही फायदा पाहिला नाही परंतु गेल्या काही दिवसापासून नेवासा तालुक्यातील स्थानिक भाजप नेतृत्व हे निष्ठावान भाजप कार्यकर्त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्याकडून वेळोवेळी अपमानास्पद वागणूक मिळते त्यामुळे भाजपाला सोडचिट्ठी देत आ. शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला असून जेऊर हैबती व परिसरातील आ शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखाली काम करून आ शंकरराव गडाख यांचे हात बळकट करणार असल्याचे बाळासाहेब फुलमाळी यांनी सांगितले फुलमाळी यांच्या प्रवेशाने जेऊर हैबती व परिसरात भाजपला जोरदार झटका बसला आहे.
नेवासा तालुक्यातील स्थानिक भाजप नेतृत्वाला कंटाळून एकाच आठवड्यात चिंचबन मधील कार्यकर्त्यां पाठोपाठ जेऊर हैबती मधील कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने नेवासा भाजपात खळबळ उडाली आहे.




