पुणतांबा (जनता आवाज
वृत्तसेवा):- शिका , संघटीत व्हा आणि संघर्ष करा या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीतून तळागाळातील समाज हा जागृत झाला असून आपल्या न्याय हक्काकरिता सक्षम झाल्याचे प्रतिपादन एकलव्य आदिवाशी बहुजन पक्षाचे अध्यक्ष रेवननाथ जाधव यांनी केले .
कोपरगांव तालुक्यातील पुणातांबा येथे एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाच्या फलक अनावरणाप्रसंगी जाधव बोलत होते .
यावेळी रेवननाथ जाधव पुढे म्हणाले की , ” बहुजन हिताय बहुजन सुखाय ” नुसार गावोगावी आदिवासी जोडो मोहीम सुरु केल्याने मोठ्या प्रमाणात महीला व तरुणांचा प्रतिसाद मिळत असून एकलव्य आदिवाशी बहुजय पक्षाच्या वतीने समाज्याच्या तळागाळातील माणसाला न्याय हक्क मिळवून देणारा एकमेव पक्ष असेल तसेच पक्षाला प्रत्येक पदाधिकारी , प्रतिनिधींना विशिष्ट प्रकारचे ट्रेनिंग देऊन सर्व कार्यासाठी कार्यकर्त्याला सक्षम तयार करणार ” शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा न्यायासाठी हक्का ने लढा !
यावेळी प्रदेशाध्यक्ष भाऊराव माळी , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माधव भांगरे , जिल्हा संघटक बाळासाहेब जाधव , विजय पिंपळे , जिल्हा उपाध्यक्ष मारुती गायकवाड , महीला आघाडी अध्यक्षा सौ निर्मला पवार , सौ शोभा बारगळ , सौ देवका शिवदे ,सौ कविता कांबळे , जिल्हाध्यक्ष भीमा साळुंखे , तालुकाध्यक्ष साईनाथ सोनवणे , शाखाध्यक्ष भीमा पवार , सचिव किशोर पवार , उत्तर संपर्क प्रमुख विठ्ठल सोनवणे , भीमराज माळी (उत्तर जिल्हा संपर्कप्रमुख , अण्णासाहेब तुपे (चरण समाज नेते ) , मारुती पवार , चंद्रभान साळुंखे, , भाऊसाहेब साळुंखे , अशोक सोनवणे , छबु गोरे , प्रकाश पवार , संजय सोनवणे , पोपट माळी , युवराज माळी , मच्छिंद्र पवार, सोनवणे , रामनाथ निकम, आदी उपस्थित होते .