नगर( जनता आवाज वृत्तसेवा ): – अहमदनगर महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील 11 विद्यार्थ्यांची कॅम्प्स इंटरव्यूमध्ये निवड झाली. अहमदनगर महाविदयालयाच्या संगणकशास्त्र विभागाच्या वतीने नुकतेच placement Drive चे आयोजन करण्यात आले. Profound Edutech कंपनीने विद्यार्थ्यांच्या चार मुलाखती घेतल्या.
सर्वप्रथम अॅप्टीट्यूड टेस्ट झाली, नंतर ग्रुप डिस्कशन, मशिन टेस्ट आणि पर्सनल इंटरव्यू या फेर्या झाल्या. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनी मोफत ट्रेनिंग देणार आहे. बी. एस. सी. (संगणकशास्त्र), बी.सी.ए (सायन्स), बी. बी. ए. ( कॉम्प्युटर अॅप्लीकेशन), एम् एस् सी. (संगण -शास्त्र), एम. एस. सी. (कॅम्प्यूटर ऑप्लिकेशन) चे शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.
या कॅम्प्स इंटरव्यूमध्ये रिया पारगे, स्वप्निल झिने, कोमल माने, सय्यद सहेरिश, देबािंस्मत घोष, साहिल शेख, रिषभ कुंभारे, श्लोक रासकर, रिया मुनोत,सुमान गोपलानी आदींनी यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य आर.जे.बार्नबस यांनी पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला. यावेळी ते बोलताना म्हणाले कि, विद्यार्थ्यांना शिक्षण देताना सर्व गोष्टींचा विचार करुन त्यांना परीपुर्ण शिक्षण दिले जाते. जेणे करुन त्यांना भविष्यात कुठेही कोणतीही अडचण निर्माण होऊन नये. उच्च दर्जाचे शिक्षण दिल्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात अहमदनगर महाविद्यालयाचे विद्यार्थी यशस्वी होतात. प्रत्येक विद्यार्थ्यांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राध्यापक करत असतात, त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी अहमदनगर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा कल असतो, त्यातच महाविद्यालयाची प्रगती आणि चांगले शिक्षण देणारा महाविद्यालय म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक आहे, असे ते म्हणाले.