साञळ दि.३०( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सात्रळ ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या वतीने “ यशस्वी होण्याचे पाच मंत्र “ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाल्याची माहीती प्राचार्य डाॅ.प्रभाकर डोंगरे यांनी दिली.
यात प्रमुख व्याख्याते म्हणून बिजनेस ऑपरेशन हेड, शोध ॲडव्हानटेक श्री मैत्रेय मुदकवी आणि करियर गाईड अँड मोटिवेटर श्री योगेश दळवी शोध ॲडव्हानटेक छत्रपती संभाजी नगर हे उपस्थित होते .या कार्यशाळेमधे यशस्वी होण्याचे पाच मंत्र या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यशस्वी होण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे कौशल्य तसेच विविध इन्स्ट्रुमेंट हाताळण्यासाठी लागणारे ट्रेनिंग आणि भविष्यात उपलब्ध असणाऱ्या विविध संधी आपण करावयाचे प्रयत्न
याविषयी मार्गदर्शन केले. ऑगस्ट २०२३ मध्ये महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांनी शोध ॲडव्हानटेक मध्ये एक महिन्याचे इन्स्ट्रुमेंट ट्रेनिंग पूर्ण केले होते त्यामुळे या विद्यार्थ्यांचा फीडबॅकही या कार्यशाळेमध्ये घेण्यात आला.ग्रामीण भागातील विद्यार्थी अत्यंत हुशार आणि मेहनती आहेच फक्त त्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध कौशल्य तसेच ट्रेनिंग गरजेचे आहे असे श्री. मैत्रय मुदकवी यांनी सांगितले. विद्यार्थ्याने कॉर्पोरेट क्षेत्रात लागणारी कौशल्य हि शिक्षण घेतानाच विकसित करणे गरजेचे आहे.
इन्स्ट्रुमेंट हाताळण्याची कुशलता, व त्यासाठी आवश्यक असणारे ट्रेनिंग, सॉफ्ट स्किल या सर्व गोष्टींची सविस्तरपणे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या कडून येणाऱ्या प्रश्नांना अतिशय सुंदर पद्धतीने उत्तरे देण्यात आली.
फक्त ग्रॅज्युएट न होता पुढे आपल्याला चांगलं करिअर करायचं असेल आणि अडचणींचा सामना करायचा असेल तर त्यासाठी फार्मा कंपनी मध्ये वापरण्यात येणारे इन्स्ट्रुमेंट चे ज्ञान असणे आवश्यक आहे तसे ते आपल्याला हाताळता येणेही आवश्यक आहे आणि म्हणून यासाठी प्रत्येक मुलाने ट्रेनिंग घेणे अत्यंत गरजेचे आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषिकेश कदम यांनी केले. पाहुण्यांचा परिचय ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या समन्वयक सौ छाया कार्ले यांनी दिला आणि प्राचार्य डाॅ. प्रभाकर डोंगरे , उपप्राचार्य डॉ.दिपक घोलप यांनी विद्यार्थ्यांना कार्यशाळा आयोजित करण्यामागचा उद्देश समजून सांगितला.सूत्रसंचालन कु. निकिता कोरडे आणि कु. पुजा सिनारे यांनी केले. ग दीपक गागरे यांनी आपले शोध ॲडव्हानटेक येथे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर चे मनोगत या कार्यशाळेमध्ये व्यक्त केले आणि कार्यक्रमाचा फीडबॅक दिला. गाढे विपुल यांनी आभार मानले.
यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. प्रभाकर डोंगरे , उपप्राचार्य डॉ.दिपक घोलप ,उपप्राचार्या डॉ.जयश्री सिनगर , ,रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.अमित वाघमारे, डॉ.शिवाजीराव पंडित , डॉ. विजय कडनोर, प्रा.स्वाती कडू, प्रा. दीप्ती आगरकर, प्रा. शरयू दिघे , प्रा. तांबे प्रियांका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.