श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- गेल्या दोन वर्षापासून धुळ खात पडलेले धान्य ग्रेडिंग मशीन लवकरच सुरू करू असे आश्वासन देत कांदा खरेदीतील फसवाफसवी तात्काळ रोख लावण्याबरोबर पाकीटमार, भुरटे चोर व मोबाईल लंपास करणाऱ्यांचा कडक बंदोबस्त करण्यात येईल, अशी ग्वाही श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी दिली.
शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष निलेश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली सभापती नवले यांना या संदर्भातील निवेदन घेण्यात आले. निवेदनकर्त्यांशी बोलताना नवले यांनी हे आश्वासन दिले. प्रकाश जाधव,बाळासाहेब घोगरे,बॉबी बकाल, जितेंद्र जैन, श्रीराम त्रिवेदी, मधुकर काकड, नारायण पवार, कडू पवार, साहेबराव चोरमल आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.
श्रीरामपूर बाजार समिती मोकळ्या कांदा लिलावात शेतकऱ्यांच्या कांद्यास खरेदी करताना एक व पट्टी पेड करताना दुसरा भाव केला जात आहे. मोकळ्या कांद्यासाठी बोली लावून दिला होतात पण व्यापारी गाड्यावर कांदा ट्रॅक्टर खाली करताना सुमारे 200 ते 300 रुपये भाव कमी करतात. यामुळे शेतकऱ्यांना टनामागे दोन ते तीन हजार रुपये कमी घ्यावे लागतात. शेतकऱ्यांची होणारी ही थट्टा थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.
बाजार समिती आवारात शेतकऱ्यांचे मोबाईल चोर, खिसे कापू, भुरटे चोर यांच्यापासून संरक्षण करण्याची मागणी संघटनेने करतात त्यावर लगेच कारवाई करून असे सभापती नवले म्हणाले. दरम्यान शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सर्व त्या मागण्या सभापती सुधीर नवले यांनी जागेवरच सोडून त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना तसेच निर्देश दिल्याबद्दल शेतकरी संघटनेच्या तालुका स्तरावरील सर्व त्या पदाधिकारींनी नवले यांचे धन्यवाद मानले.