श्रीगोंदा ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ या ठिकाणी भोसले वस्ती जवळ मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञातांनी योगेश सुभाष शेळके वय ३३वर्षे हा गाढ झोपेत असताना त्याच्या गळ्यावर उजव्या हातावर उजव्या पायावर कोयताने वार करून जीवे ठार मारले. याबाबत बेलवंडी पोलीस स्टेशनला चार अज्ञातांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मयत योगेश सुभाष शेळके हा मूळचा पळवे तालुका पारनेरचा असून सुमारे दहा ते बारा वर्षांपासुन कोथुळ या ठिकाणी शेती विकत घेऊन राहत होता. काल जेवण करून माझे दोन लहान मुले सासरे व पती जेवण करून झोपलो मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चार अज्ञातांनी इसमांनी घराचा दरवाजा वाजावला असता मयताची पत्नी आरती योगेश शेळके यांनी झोपेतून उठून घराचा दरवाजा उघडला असता चार जण दारात काळे कपडे घालून तोंड बांधुन हातात कोयते घेऊन उभे होते. यातील एकाने माझ्या गळ्याला कोयता लावला तू जर आरडा ओरडा करशील तर तुला ठार मारून टाकीन अशी धमकी दिली.बाकीचे तिघांनी घरात प्रवेश करून झोपेत असलेले माझे पती योगेश सुभाष शेळके वय ३३ वर्षे यांच्या गळ्यावर उजव्या हातावर उजव्या पायावर कोयताने वार करून जीवे ठार मारले व पळून गेले.त्यानंतर आरडाओरडा केल्याने शेजारील लोक जमा झाले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, पीएसआय राजेंद्र चाटे, पीएसआय गाजरे,पो हे कॉ. नंदकुमार पठारे,पो.हे.कॉ. खेडकर, पो. कॉ. संदीप दिवटे, पो. कॉ. कैलास शिपणकर यांच्यासह बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
घटनास्थळी पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, डीवायएसपी विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी भेट देऊन तापसाबाबत सूचना केल्या.
दोन संशयीतांना ताब्यात घेतले असून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत त्यादृष्टीने तपास चालू केला आहे. कारण या घटनेमध्ये घरातील कुणालाही मारहाण केली नाही घरातील कुठलीही डाग दागिने चोरी गेले नाहीत यामुळे तपास वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी बेलवंडी पोलिसांची चार पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके आरोपींच्या मागावर असून लवकरच उर्वरित आरोपी गजाआड केले जातील.
—- संतोष भंडारे(पोलीस निरीक्षक, बेलवंडी)