23.2 C
New York
Friday, August 8, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपूर काँग्रेस बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष समोरच ससाणे गटाचे कार्यकर्त्यांची आमदार लहू कानडे वर टीका, त्याचबरोबर पुन्हा उमेदवारी देण्यास विरोध

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर आगामी विधानसभा निवडणूकमध्ये

काँग्रेस  काँग्रेस पक्षाची उमेदवारी विद्यमान आमदार लहू कानडे यांना देण्यात ससाणे गटाने तीव्र विरोध दर्शवलेला असून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ससाणे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार कानडे वर टीकेची झोड उठवली.

 महत्वाची गोष्ट म्हणजे  लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाची जिल्हाभर मोर्चा बांधणी सुरू असताना श्रीरामपूर मध्ये काँग्रेसची एक नवे तर दोन स्वतंत्र गट पाहायला मिळाले. व त्यांच्यातील मतभेद हे चव्हाट्यावर आले आहे.

 शनिवारी अपूर्वा हॉल येथे ससाणे गटाची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष  राजेंद्र नागवडे, समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, हेमंत ओगले, सुधीर नवले, संजय छल्लारे, अण्णासाहेब डावखर, दिलीप नागरे, दत्तात्रय सानप, राजेंद्र सोनवणे, निलेश भालेराव, आशिष धनवटे इत्यादी उपस्थित होते. या बैठकी मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी यापुढील काळात कशा प्रकारचे एकजुटीने काम करावे याबाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. 
 मात्र बैठकीत सुरुवातीपासून कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे आ. लहू  कानडे यांच्यावर  टीका करण्यास सुरुवात केली. काँग्रेस मुळे आणि ससाणे गटाच्या कार्यकर्त्यांना मुळेच आ. लहू कानडे हे आमदार झाले आहेत. आमदार झाल्यानंतर ज्यांनी त्यांना निवडून आणले त्यांना ते विसरले आणि आता विरोधकांना बरोबर घेऊन ते फिरत आहे. अशी प्रकारची जोरदार टीका बहुतांशी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी करण ससाणे, सभापती सुधीर नवले, मुजफ्फर शेख, संजय छल्लारे, निलेश भालेराव, राजेंद्र सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आपली मतं मांडली. यावेळी सचिन गुजर यांनी बराच वेळ आग्रह करूनही त्यांनी यावेळी भाषण करणे टाळले.
 दुसरी बैठक बेलापूर रोडवरील आमदार कानडे यांच्या यशोधन हॉल या संपर्क कार्यालय मध्ये झाली. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर बराच वेळाने जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि ज्ञानदेव वाफारे हे ससाणे गटाच्या बैठकीकडे  आले. त्यांना ससाणे गटाच्या बैठकीकडे येता येताना  उशीर झाल्याने आ. कानडे  यांनी तुम्हाला अडून धरले का? अशा प्रकारच्या प्रश्नापासून या बैठकीला वादळी सुरुवात झाली.
 आमदार कानडे यांनी आमदारकीचे कामकाज पाहायचे बाकी नगरपालिकेपासून स्थानिक इतर निवडणुकीची जबाबदारी ससाणे गटावर राहील. असे निवडणुकीपूर्वी माझी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ सुधीर तांबे यांच्या समक्ष ठरले होते. मात्र तो शब्द आमदार कानडे यांनी पाळला नाही. म्हणून आमचे कार्यकर्ते जे बोलतात ते बरोबर बोलत आहे. ससाणेच्या काँग्रेस मधील संघटनेला बाजूला करून  या ठिकाणी परस्पर दुसऱ्या कुणी आमदार होणे नाही.
– मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे 
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!