लोणी दि.३१( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालय लोणी येथील अंतिम वर्षात शिकत असलेल्या कृषिदुतांच्या माध्यमातून दुभत्या जनावरांमधील आहार आणि रोग व्यवस्थापन याविषयी चर्चासत्राचे मौजे अस्तगाव येथे आयोजन करण्यात आले होते.
या चर्चासत्रास डेअरी डिप्लोमा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब मोकाटे प्रा.गोरक्षनाथ अंत्रे, डॉ.एस.एस.दिघे, कार्यक्रम समन्वयक डाॅ. रमेश जाधव यांनी दुभत्या जनावरांमधील आहार आणि रोग व्यवस्थापन या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी पशुआहारामध्ये मिश्र चारा पद्धत, कोरडाचारा, मूरघास बनवण्याची पद्धत आणि पशुमधील रोग नियंत्रण व मुक्त गोठ्याचे महत्त्व दुधउत्पादक शेतकर्यांना पटवुन दिले.यावेळी दुग्ध उत्पादक रोहित जेजूरकर,सरपंच सविता चोळके,उपसरपंच मनिषा मोरे,अनिल नळे ,नवनाथ नळे ,रविंद्र जेजुरकर इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगी साळोखे, कार्यक्रम समन्वयक मा.डॉ. रमेश जाधव ,कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपाली तांबे , डाॅ. विक्रम अनाप यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत ढगे पृथ्वीराज , मोटे संकेत , तळेकर शुभम, देशमुख सिद्धांत, वानखेडे उमेश , भोसले सुयश यांनी प्रयत्न केले.




