27.2 C
New York
Saturday, August 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

शिवांकुर विद्यालयाचे गणित प्राविण्य परीक्षेमध्ये यश…

राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा) :-अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेमध्ये विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, सर्व विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. हे सर्व विद्यार्थी राज्य प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र झाले यामध्ये गुंड सई मच्छिंद्र, ढोकणे अक्षदा रवींद्र, गाडे आरती बाबासाहेब, म्हसे ओंकार सुनील, मंडलिक कृष्णा अशोक, राजनोर गौरी रवींद्र हे विद्यार्थी राज्य प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र झाले. संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश पवार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रसंगी विश्वस्त भास्कर पवार, उत्तमराव पवार, सचिव डॉ. प्रकाश पवार, खजिनदार डॉ. किशोर पवार, सौ मंगलताई पवार, युवराज पवार, ज्योतीताई शेळके यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास शिवांकुर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सुनील लोळगे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, शितल फाटक, सुजाता तारडे, रुपाली रासने, सुनीता ढोकणे रोहिणी भाकरे, प्रिया लांबे, अनिता लांबे, तनुजा झुगे, पल्लवी भालदंड व लिपिक, अर्चना पाळंदे शिपाई शारदा तमनर, सिद्धेश्वर भोईटे,आदींसह बहुसंख्य पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!