लोणी दि.२( जनता आवाज वृत्तसेवा ):-दर्जेदार शिक्षणासोबतचं आदर्श नागरीक घडविण्यात प्रवरा शैक्षणिक संकुल हे अव्वल स्थानावर आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरचं विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमातून आदर्श नागरीक घडविण्याबरोबर पायरेन्स संस्था ही सामाजिक कार्यात ही सक्रीय आहे.पायरेन्स संस्थेच्या व्यवस्थापन महाविद्यालयास नॅक नामांकनात सी जी पी ए ३ सह बी प्लस प्लस ग्रेड मिळाली असून महाविद्यालय ग्रामीण भागातील व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण देणारे देशात आणि महाराष्ट्रात सर्वोच्च स्थानावर पोहचले आहे अशी माहीती संस्थेचे सचिव डाॅ.निलेश बनकर यांनी दिली.
राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषद बंगलोरच्या टिमने भेट दिली होती. १९९३ मध्ये सुरु झालेल्या या महाविद्यालयात ग्रामीण भागातील ५१० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. महाविद्यालयामध्ये पायाभूत सर्व सेवा-सुविधा बरोबरचं मुलीसाठी सुरक्षित कॅम्पस म्हणून प्रवरेची वेगळी ओळख आहे. कौशल्य विकास केंद्र,नोंदणीकृत माजी विद्यार्थी संघ, उच्च शिक्षीत प्राध्यापक, सौर ऊर्जाचा वापर, पर्यावरण पुरक परिसर, प्लेसेंमेट विभाग शिवाय शासकीय शिष्यवृत्ती बरोबरचं गरीब विद्यार्थी सहाय्य निधी योजना, कमवा व शिका योजना या सुविधा बरोबरच अभ्यासपूरक उपक्रम, विद्यार्थी शिक्षक दत्तक गाव योजना, विद्यार्थी आरोग्य विमा, महीला सक्षमीकरण, लघु संशोधन प्रकल्प याद्वारे विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देण्यावर भर असतो.
महाविद्यालयातून अनेक विद्यार्थ्याना प्लेसमेंट देण्यात आली असून विविध कंपन्याशी शैक्षणिक करार करण्यात करण्यात आले आहेत. परिसंवाद,चर्चासञ,कार्यशाळा आणि प्रक्षेञ भेटीतून करीअर मार्गदर्शन होत असते.या सर्वाची दखल घेत महाविद्यालयास बी प्लस प्लस ग्रेड प्राप्त झाली आहे. यासाठी नॅक समन्वयक डाॅ. मोहसीन तांबोळी,आयबीएमए च्या संचालिका डॉ. अनिता खटके, प्राध्यपक आणि कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.सुप्रियाताई ढोकणे यांनी अभिनंदन केले.