देशभरातून २९६ या रिक्त पदासाठी अर्जाची मागणी करण्यात आली होती यामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील माजी विद्यार्थी कु.सुप्रिया संजय काळे हिने अर्ज भरून प्रथम व द्रुतीय फेरी देऊन पात्र होऊन संपूर्ण भारतामधून ३७ रँक मिळवला तसेच कागदपत्रे तपासणी नंतर भारतातील वेस्ट झोन मधील कार्यालयात काम करण्याची संधी मिळणार आहे. तिचे मिळालेले यश हे नक्कीच प्रवरेसाठी कौतुकास्पद बाब आहे.
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे नोकरीसाठी निवड.
लोणी दि.१२ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.सुप्रिया संजय काळे हिची फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) मध्ये टेक्निकल सहाय्यक म्हणून निवड झाल्याची माहिती प्राचार्य डाॅ.विशाल केदारी यांनी दिली.
सदर विद्यार्थिनीला महाविद्यालयाचे डाॅ.अमोल सावंत, प्रा.महेश चंद्रे, प्रा. भाऊसाहेब घोरपडे, डॉ. स्वप्नील नलगे, डॉ.अमित अडसूळ, प्रा. परिमल विखे, प्रा. स्वरांजली गाढे, प्रा. प्रविण गायकर, प्रा.मीनल शेळके, प्रा. सारिका पुलाटे, प्रा. मनीषा आदिक यांचे मार्गदर्शन लाभले.
सुप्रिया काळे च्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे महसुल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जि.प.माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा.डॉ.सुजयदादा विखे पाटील, कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, प्राचार्य. डॉ.विशाल केदारी तसेच इतर शिक्षक वृंदानी अभिनंदन केले