संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी महसूलमंत्री आ बाळासाहेब थोरातयांच्या वाढदिवसानिमित्ताने खा अमोल कोल्हे यांची संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका असलेले शिवपुत्र संभाजी या महानाट्या च्या माध्यमातून संगमनेरकरांच्या भेटीला येत आहे. संगमनेरात प्रथमच होणाऱ्या महानाट्यातून छत्रपती संभाजी महाराजां यांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंतचा मराठ्यांचा धगधगता इतिहास ४ फेब्रुवारी पासून ७ फेब्रुवारीपर्यंत संगमनेरकरांना अनुभवयास मिळणार आहे.
महेंद्र महाडिक लिखित शिवपुत्र संभाजी महानाट्यात छत्रपतीसंभाजी महाराज यांच्या प्रमुख भूमिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खा डॉ अमोल कोल्हे महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर, अनाजी पंतांच्या भूमि केत महेश कोकाटे, औरंगजेबाच्या भूमि केत ज्येष्ठ कलाकार राजन बाने ,कविकल शांच्या भूमिकेत अजय तकपिरे, सेनापती हंबीर रावच्या भूमिकेत रमेश रोकडे तर दिलेर खान आणि मुकर्र बखान यांच्या दुहेरी भूमिकेत विश्वजीत फडतें या नामा कींत कलाकारांचे संगमनेरकरांना दर्शन होणार आहे या महानाट्यात शहरातील १५०हुन अधिक स्थानिक कलाकार सुद्धा सहभागी होणार आहे त्यांची रंगीततालीम घेण्याचे काम सुरू आहे या महानाट्यात खरी खुरी लढाई, हत्ती,घोडे आणि बैल गाड्यांचा वापर, २६ फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम, चित्त थरारक घोडेस्वारी आदी प्रमुखआकर्षणे राहणार आहेत.
या महानाट्यासाठी जाणता राजा मैदानावर १२० फुटी राय गड किल्ल्याचा रंगमंच, उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे .तसेच घोड्यांना फिरण्यासाठी बैठक व्यवस्थेच्या बाजूने स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. रंगमंचावर आक र्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे महानाट्य सर्वांना व्यवस्थित पाहता यावी म्हणून एलईडीची ही व्यवस्था केली आहे हे महानाट्य मोफत असल्यामुळे तसेच वाढती गर्दी लक्षात घेता आमदार थोरात यांच्या यंत्रानेच्यावतीने प्रत्येक दिवशी गट व गणाप्रमाणे नियोजन केले आहे केले आहे.
संगमनेरात होणाऱ्या शिवपुत्र संभाजी या महानाट्यात संगमनेर शहरातील दीडशे स्थानिक कलावंतांचा सहभाग राहणार आहे या महानाट्यात जे कलाकार उत्कृष्ट कला सादर करतील त्या मोजक्या कलाकारांना पुढील वेळी मोठ्या शहरात होणाऱ्या महानाट्यात सहभागी करून घेतले जाईल असे या महानाट्याचे कार्यकारी निर्माता शैलेश थोरात यांनी दैनिक जनता आवाजशी बोलताना सांगितले