लोणी दि.३( जनता आवाज वृत्तसेवा ):-शिक्षणातून माणूस घडत असतो. गरीबातील गरीब शेतक-याला शिक्षण मिळावे यासाठी ग्रामीण भागात शिक्षणांतून परिवर्तन पद्यश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील यांनी केले. म्हणून उस पिकविणा-या शैतक-यांची पोरं आज जगाच्या पाठीवर पोहचली आहेत.शिक्षण घेता आपण ही या समाजांचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना परिसरातील ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून त्यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जात आहे.
ऊसतोड मजुरांच्या वस्तीमध्ये अनेक पाच ते चौदा वर्षापर्यंतची अनेक मुले-मुली आहेत. ही मुले आपल्या मूळ गावापासून दूर इथे राहतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत जाणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी प्रवरा बी.एड. कॉलेजचे विद्यार्थी ऊसतोड मजुरांच्या मुलांमध्ये वाचन-लेखन क्षमता विकसित करण्याचे काम करत आहेत. प्रत्येक सोमवार, गुरुवार आणि शनिवारी बी.एड. महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यांच्या वस्तीवर जाऊन मुलांना प्राथमिक शिक्षणाचे धडे देत आहेत. बी.एड. च्या विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने मुलांना शैक्षणिक साहित्य पुरविले आहे. ऊसतोड करणाऱ्या महिलांसाठी बी.एड. च्या विद्यार्थिनीकडून हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जोपर्यंत ही मुले वस्तीवर आहेत तोपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. असे प्राचार्या डाॅ.विद्या वाजे यांनी सांगितले.
यासाठी शाळा उपक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. सचिन भोसले आणि प्रा.सौ. नयना औताडे सर्व नियोजन करत आहे.या उपक्रमासाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. अमोल पाटील, शेतकी अधिकारी श्री. संजय मोरे, सचिन आहेर यांचे सहकार्य लाभले.
शिक्षणापासन कुणी वंचित राहू नये यासाठी प्रवरा ग्राणीण शिक्षण संस्था ही संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत शिक्षणशास्ञ महाविद्यालयांच्या या उपक्रमामुळे उसतोडणी कामगारांची मुले शिक्षणांचा प्रवाहात आले आहेत.