तर प्रथमेश जाधव याने ५० मीटर बटरफ्लाय स्ट्रोक या प्रकारामध्ये रौप्य पदक तर तर ५० मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारामध्ये कास्यपदक पटकावले, या दोन्ही खेळाडूंचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय गुल्हाने तसेच डॉ एल. बी अभंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या दोन्ही खेळाडूंना प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तसेच जलतरण प्रशिक्षक डॉ श्रीनिवास मोतीयेळे, अकील शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रतीक आणि प्रथमेश यांनी जलतरण स्पर्धेमध्ये यश
लोणी दि.१२ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-स्वर्गीय हणमंतराव बिरादार यांच्या स्मृती प्रित्यर्थ, छत्रपती संभाजी नगरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जलतरण येथे झालेल्या स्विम मराठवाडा – २०२३ या जलतरण स्पर्धेमध्ये ओपन कॅटेगिरी मध्ये प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रतीक चिंचाणे याने २०० मीटर वैयक्तिक मिडले या प्रकारामध्ये सुवर्णपदक, ५० मीटर बॅकस्ट्रोक या प्रकारामध्ये रौप्य पदक, ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारामध्ये कास्यपदक पटकावले
या निवडीबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल राधाकृष्ण विखे पाटील, ज़िल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील,संस्थेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,सह सचिव भारत घोगरे, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय गुल्हाने, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे डॉ विजय राठी, क्रीडा संचालक प्रमोद विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.