नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):- अहमदनगर येथील इंटर डिप्लोमा इंजिनिअरिंग स्पोर्ट्स स्टुडंट्स असोसिएशन- इ-१ झोन आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नेप्ती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इ-१ झोन विभागीय बुध्दिबळ व कॅरम (मुले व मुली) क्रिडा स्पर्धा दि.३१. जानेवारी रोजी मुले व १ फेब्रुवारी २०२४ रोजी मुलींसाठी संपन्न झाल्या . यामध्ये एकून ९ महाविद्यालयांचा सहभाग असून एकूण बुद्धिबळस्पर्धेसाठी १३ मुले व ७ मुलींचा संघ तसेच कॅरमसाठी १४ संघ मुलांचे व ८ संघ मुलींचे असे होते.
बुद्धिबळ(मुले)विजेता संघ:- अमृतवाहिनी तंत्रणिकेतन, संगमनेर व उपविजेता संघ:- शासकीय तंत्रणिकेतन, अहमदनगर आणि (मुलींमध्ये) विजेता संघ:- संजीवनी तंत्रणिकेतन, कोपरगांव व उपविजेता संघ:- शासकीय तंत्रणिकेतन, अहमदनगर
तसेच कॅरम (मुले) विजेता संघ:- अमृतवाहिनी तंत्रणिकेतन, संगमनेर. उपविजेता संघ:- परिक्रमा तंत्रणिकेतन, काष्टी मुलींमध्ये विजेता संघ:- श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, नेप्ति तर उपविजेता संघ:- संजीवनी तंत्रणिकेतन, कोपरगांव असे ठरले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाय. आर . खर्डे यांनी विद्यार्थ्यांचे मिळालेल्या यशाबद्दल कौतुक करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थी असेच यश संपादन करतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. क्रीडा विभागामार्फत आयोजित या स्पर्धांसाठी समन्वयक प्रा.अविनाश हंडाळ यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले तसेच प्रा. ए एस कांबळे (सिव्हील विभाग) व प्रा. एस ए वणवे (कॉम्पुटर विभाग ) यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले . प्रा. डॉ. वाय आर खर्डे यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. टि पी ध॑गेकर यांनी केले .
संस्था स्तरावरून अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज चे अध्यक्ष. मा.श्री.रा.ह.दरे साहेब, सचिव मा.श्री. जी.डी.खानदेशे साहेब, सहसचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉक्टर विवेक भापकर साहेब, विश्वस्त ॲड. दीपलक्ष्मी म्हसे मॅडम तसेच संस्था सदस्य-पदाधिकारी यांनी खेळामध्ये मिळालेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.