लोणी दि.५( जनता आवाज वृत्तसेवा ):– औषध निर्माण शास्त्रात रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या सर्व संधींचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्या क्षेत्रातील सर्व आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली व ते ज्ञान आपण अवगत केले तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण भविष्यात उद्भवणार नाही.
विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत परिपूर्ण शिक्षण घेऊन स्वयंपूर्ण बनावे असे प्रतिपादन लाइफ ऑन लॅब प्रायव्हेट लिमिटेड चे एलीब्स फार्मासिटिकल इम्पोर्टचे संचालक प्रकाश सोनवणे यांनी केले.लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यशाळेप्रसंगी प्रकाश सोनवणे बोलत होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र जाधव, प्रा. अर्चना राजदेव, डाॅ. विशाल तांबे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विशाल तांबे यांनी केले. ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा.अर्चना राजदेव यांनी आभार प्रदर्शन केले.