डॉ जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले एकविरा फाऊंडेशन संगमनेर, आयोजित महिला बचत गटांसाठी पत्रावळी बनवणे हे उद्योजकता आणि कौशल्य मार्गदर्शन व प्रशिक्षण फाउंडेशन अंतर्गत घेण्यात आले. एकविरा फाऊंडेशन अंतर्गत तालुक्यातील मुलींना महिलांना त्यांच्यातील असलेले कला कौशल्यांना प्रोत्साहन देऊन व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी फाऊंडेशन अंतर्गत वर्षभर वेगवेगळे उपक्रम घेण्यात येत असतात.
यातीलच एक म्हणजे उद्योजकता मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर आज दिनांक 11 जून 2023 रोजी संगमनेर औद्योगिक वसाहत मध्ये हे मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आली.औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष श्री. के.के .थोरात तसेच उद्योजकता आणि कौशल्य या विषयावरती सखोल मार्गदर्शन करणारे श्री दीपक पावसे आणि साई इंडस्ट्रीच्या संचालिका सौ कोमल उगले यांचे या उद्योजकता आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी विशेष मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.
श्री दिपक पावसे यांनी बचत गटातील उपस्थित असलेल्या महिलांना एक यशस्वी उद्योजिका बनण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहे ,उद्योग धंद्या करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती, विविध योजना, उद्योग धंद्या सुरू करण्यासाठी सरकार अंतर्गत असलेल्या विविध योजना, कच्चामालाची उपलब्धता, उपलब्ध असलेल्या बाजारपेठा, विपणन कौशल्य, संभाषण कौशल्य अशा अनेक गोष्टींवर श्री पावसे यांनी उपस्थित असलेल्या महिलांना सखोल असे मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच साई इंडस्ट्री संगमनेर यांच्या संचालिका सौ कोमल उगले यांनीही उपस्थित असलेल्या महिलांना पत्रावळी बनवणे हा त्यांचा उद्योग त्यांनी कसा उभा केला तसेच उद्योग व्यवसाय करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतात ,उद्योग करत असताना येणाऱ्या अडचणी या कशा सोडवाव्यात, उद्योगासाठी लागणारा कच्चामाल, मशिनरी, तो कसा चालवावा त्याला उपलब्ध असलेलं बाजारपेठ, भांडवल खर्च, मनुष्यबळ अशा सर्व बाबीं बद्दल त्यांनी महिलांना सखोल असे मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षण चालू असताना महिलांनी देखील आपले मनातील अनेक शंका- प्रश्न हे सौ उगले यांच्यासमोर मांडले व त्या दृष्टीने व सौ कोमल विजय उगले मॅडम यांनी महिलांच्या सर्व प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले.
उद्योजकता बद्दल मार्गदर्शन केल्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व बचत गटातील महिलांना प्रत्यक्षात पत्रावळी कशा बनवल्या जातात हे फॅक्टरी वरती(साई प्लास्टो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर 15 औद्योगिक वसाहत संगमनेर )जाऊन त्यांना सर्व प्रात्यक्षिक ,माहिती सहित दाखवण्यात आले कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल ,वेगवेगळ्या मशिनरी ,साहित्य मनुष्यबळ हे महिलांना प्रत्यक्षात बघता आले व त्याविषयी सर्व माहिती महिलांनी जाणून घेतली.
आर्थिक दृष्ट्या महिलांनी सक्षम व्हावं आपल्यातील असलेले उद्योजकता कौशल्य त्यांनी आपल्या विकासासाठी वापरावेत महिलांची वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक ,आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने अशा अनेक प्रशिक्षण शिबिर फाउंडेशन अंतर्गत घेण्यात येत आहेत आजच्या या उद्योजकता मार्गदर्शन व प्रशिक्षणासाठी संगमनेर तालुक्यातील जवळजवळ 60 महिलांनी या प्रशिक्षणासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अशा विविध प्रकारच्या महिलांसाठी त्यांच्या वैयक्तिक व आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. एकविरा मार्केट ही संकल्पना गेल्या चार वर्षापासून संगमनेर मध्ये घेण्यात येत आहे ज्या ठिकाणी बचत गट व इतर सर्वच महिलांना हक्काचे व्यासपीठ व बाजारपेठ निर्माण करून दिली जात आहे या माध्यमातून अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षमतेकडे वाटचाल करत आहेत.
आजच्या उद्योजकता मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळेस फाऊंडेशनच्या सदस्या सौ ज्योती थोरात , डॉक्टर वृषाली साबळे , कु.शिल्पा गुंजाळ,सौ प्राजक्ता घुले , डॉक्टर सुरभी असोपा,कु. तृष्णा औटी उपस्थित होत्या.