कर्जत (जनता आवाज वृत्तसेवा):- संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेले कर्जत बाजार समिती सभापती उपसभापती निवडीकडे होते.कर्जत बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. मात्र, यात आमदार राम शिंदे यांनी बाजी मारली आहे. शिंदे गटाचे सभापती पदाचे उमेदवार काकासाहेब तापकीर यांना नऊ मते मिळाली. तर रोहित पवार गटाचे सभापती पदाचे उमेदवार यांना आठ मते मिळाल्याने ते पराभूत झाले, एक मत अवैध ठरल्याचे निवडणूक प्रक्रियेत दिसून आले.
उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिंदे गटाचे पाटील अभय पांडुरंग यांना दहा मते मिळाली त्यामुळे ते विजयी झाले. तर रोहित पवार गटाचे उमेदवार श्रीहरी कैलास शेवाळे यांना आठ मते मिळाल्याने ते दोन मतांनी पराभूत झाले. यामुळे पवार यांच्या गटाचे एक मत फुटल्याचे स्पष्ट होत आहे. सभापती पदाच्या मतदान प्रक्रियेनंतर एक मत बाद झाल्याचे स्पष्ट झाले. रोहित पवार यांच्या गटाचे नऊ सदस्य असतानाही आठच मते मिळाल्याने पवार गटाचा सदस्य फुटल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.



