राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):- साकुरी येथील पोस्ट ऑफिसचा अनागोंदी कारभार काही थांबता थांबत नाही दररोज नवनवीन तक्रारी या पोस्ट कार्यालययाच्या येत आहे त्यामुळे सदरील पोस्ट ऑफिस असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिति या कार्यालयाची झालेली आहे.
याबाबत संविस्तर माहिती अशी की, साकुरी येथील डी. फार्मसीचा विद्यार्थी कु. आशुतोष बाबासाहेब रोहोम या मुलाचे डी. फार्मसी चे उत्तीर्ण प्रमाणपत्र साकुरी पोस्ट कार्यालयमध्ये जून २३ मध्ये आलेले होते. सदरील प्रमाणपत्र घेण्यासाठी हा विद्यार्थी हा पोस्ट कार्यालय मध्ये चकरा मारत होता परंतु येथील पोस्टमन अजून आपले प्रमाणपत्र आलेले नाही म्हणून या मुलाला तेथून रवाना करत होता याबाबत सदरील डी. फार्मसी च्या मुलाने कॉलेज प्रशासनाकडे विचारणा केली असता सदरील प्रमाणपत्र हे साकुरी पोस्ट कार्यालयमधून जुलै २३ मध्ये डिलिव्हरी झाल्याचे दिसत होते याबाबत मुलाच्या पालकांनी पुनः आज साकुरी पोस्टात गेले असतं तेथे उपस्थित असलेल्या पोस्टमन ने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली याबाबत मुलाच्या पालकांनी श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालय मध्ये तक्रार दखल केली आहे परंतु या साकुरी च्या पोस्टमन च्या गहाळ कारभारामुळे सदरील मुलगा हा पुढील एम. फार्म च्या शिक्षणापासून वंचित राहील आहे .
साकुरी पोस्ट कार्यालय मधील कर्मचारी कधीही वेळेवर येत नाही वास्तविक कार्यालयाची वेळ ही सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत असताना तेथील कर्मचारी मात्र मनमानी पद्धतीने काम करतात दुपारी १२ वाजता येतात व एक तासभर थांबून निघून जातात नागरिकांचे टपाल वेळेवर दिले जात नाही उर्मट भाषा वापरतात याबाबत आता वारिष्ट अधिकारी यांनी लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी साकुरी ग्रामस्थ करीत आहे.