21.4 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे गोसेवा आयोगाचे काम गतिमान होणार -ना.विखे पाटील

शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ):-राज्यात स्थापन झालेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा कारभार गतिमान करण्यासाठी शासनस्तरावर आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. त्यासाठीच आयोगाला आवश्यक असलेल्या एकूण १६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. या मनुष्यबळाच्या परिपूर्ततेनंतर लवकरच आयोगाचे प्रशासकीय कामकाज गतिमान पद्धतीने सुरू होण्यास मोठी मदत होईल असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. 

पशुधनाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम, २०२३ अंतर्गत राज्यात प्रथमच महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात गोसेवा आयोग स्थापन करण्यात आला.त्यानंतर राज्यात गोसेवा आयोग स्थापन करणारे महाराष्ट्रात राज्य हे एकमेव असल्याचे विखे पाटील म्हणाले.

गोसेवा आयोगाची कार्य पद्धती निश्चित करून आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता आयोगासाठी एकूण १६ पैकी ८ नियमित पदे व ८ पदे बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्त करण्यासाठी तब्बल १ कोटी २७ लाख ५८ हजार इतक्या खर्चास देखील मंत्रीमंडळाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आल्याची माहिती विकास मंत्री विखे पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र गोसेवा आयोगासाठी पशुसंवर्धन उपायुक्त, स्वीय सहाय्यक, लेखाधिकारी, प्रशासन अधिकारी (गट ब), वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लिपिक असे प्रत्येकी एक आणि दोन पशुधन विकास अधिकारी (गट अ) असे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तर बाह्यस्त्रोताद्वारे एक कनिष्ठ लिपिक, एक स्वच्छक, दोन डेटा एंट्री ऑपरेटर, दोन परिचर, दोन सुरक्षा रक्षक असे एकूण ८ जणांची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे महाराष्ट्र गोसेवा आयोगाला अतिशय गतिमान पद्धतीने काम करता येईल, अशी माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!