4 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

युवकांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे-विवेकभैय्या कोल्हे संजीवनी फार्मर्स फोरमच्यावतीने संवत्सर शिवारात मत्स्य संवर्धनचा शुभारंभ 

कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ):-माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी येथील शेतक-यांचे हेक्टरी उत्पादन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करत शेतीला पर्यायी दुग्धव्यवसाय सुरू केला. युवकांनी शेतीपुरक व्यवसायातुन स्वतःबरोबरच परिसराची प्रगती करावी असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी केले.

तालुक्यातील संवत्सर परिसरातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापूसाहेब संपतराव बारहाते यांच्या शेतात संजीवनी फार्मर्स फोरम व संजीवनी मत्स्य विकास सहकारी संस्थेच्या विद्यमाने शेततळयातील मत्स्यपालनाचा शुभारंभ बुधवारी करण्यांत आला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.

प्रारंभी संचालक बापूसाहेब बारहाते, शिवाजीराव बारहाते, प्रकाश बारहाते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संजीवनी मत्स्य विकास सहकारी संस्थेचे अध्यक्ष कारभारी लभडे, उपाध्यक्ष विष्णुपंत क्षीरसागर यांनी संस्था प्रगतीचा आढावा सांगितला.

संजीवनी फार्मर्स फोरमचे श्री. संजीव पवार प्रास्तविक करतांना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली संजीवनी मत्स्य विकास संस्थेअंतर्गत विविध शेतक-यांना कटला, रोहु, मृगळ, मरळ, सायप्रिनस, गावठी मागुर मत्स्य पालनाबाबत प्रशिक्षण देवुन त्यातुन होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यांत आले. डॉ. नंदकिशोर इंगवले यांनी केंद्र व राज्य शासनाच्या मत्स्य संवर्धनाबाबत असलेल्या विविध योजनांची माहिती देवुन युवा अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी फार्मर (शेतकरी), फॉरेस्ट (बांबु लागवड), आणि फिशरी (मत्स्य) या तीन एफ अंतर्गत शेतक-यांची प्रगती साधण्यासाठी सातत्यांने प्रयत्न सुरू केले आहेत.

श्री. विवेक भैय्या कोल्हे पुढे म्हणाले की, संजीवनी फार्मर्स फोरम स्वतःच दर्जेदार मत्स्यबीज तयार करून ते शेतक-यांना पुरविणार आहे. त्याबाबतचे सर्व शिक्षण एकाच छताखाली देवुन शेततळयातील उत्पादीत मत्स्य विक्रीसाठीचेही मार्गदर्शन देणार आहे. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे सर्वत्र स्पर्धा सुरू झाली आहे. त्या स्पर्धेला येथील शेतकरी सामोरा जावा त्याचे प्रति एकरी उत्पन्न वाढावे यासाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी जाणिवपुर्वक प्रयत्न करत संजीवनी उद्योग समुहाअंतर्गत विविध संस्थांची स्थापना केली, सहकारातुन प्रगती साधली त्याच पावलावर पाउल ठेवुन बिपीनदादा कोल्हे यांनीही शेती व शेतकरी फायद्यासाठी पुढाकार घेत विविध उद्योगांना प्रोत्साहन दिले. युवकांनी शेती करताना ती व्यवसायभिमुख कशी होईल याचा प्रयत्न करावा. आज कित्येक मुले मुली उच्चशिक्षीत अभियंते असुन त्यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. शेतीला असंख्य जोडधंद्याची उभारणी केंद्र शासनाने केली असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी त्यासाठी अर्थसंकल्पांत भरघोस तरतुद करत नविन विकसीत भारताला आत्मनिर्भर बनवत आहे. मत्स्य संवर्धनासाठी लाखो रूपयांचे अर्थसहाय देत आहे तेंव्हा युवकांनी शेतीपुरक व्यवसाय सुरू करून स्वतःची प्रगती साधावी असेही ते म्हणाले.

याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक रमेश घोडेराव, विश्वासराव महाले,शिवाजीराव वक्ते, ज्ञानेश्वर परजणे, संजय होन,बाळासाहेब वक्ते, विलासराव माळी, कैलासराव माळी,ज्ञानदेव औताडे, संजय औताडे, निवृत्ती बनकर, ज्ञानेश्वर होन, बापूसाहेब बारहाते, माजी संचालक शिवाजीराव बारहाते, राजेंद्र भाकरे, फकिरराव बोरनारे, राजेंद्र परजणे, रामभाऊ कासार, संजय भाकरे, कचेश्वर रानोडे, प्रकाश बारहाते, शंकरराव परजणे, सरपंच प्रदीप चव्हाण, लहानु मेमाणे, महेश परजणे,मुकुंद काळे, मनोज चव्हाण, हरिभाऊ लकडे, भास्कर सुरळे, नानासाहेब शिंदे, दिलीपराव कासार, बद्रीनाथ वल्टे, व्यंकटराव धट, वसंतराव ससाणे, राजेंद्र वाकचौरे, अर्जुन वरगुडे, बाबासाहेब शिंदे, विनोद ससाणे, बाळासाहेब खर्डे, शैलेश जोशी, दिनकर बोरनारे, सचिन शेटे, अनुप शिंदे, लहानु शिंदे, राजेंद्र लोखंडे, संदीप मैंद, संदीप बारहाते, चिमाजी दैने, सुभाष लोहकणे यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी संचालक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर यांनी केले, तर संचालक ज्ञानेश्वर परजणे यांनी आभार मानले.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!