3.1 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

महाराष्ट्राला लाभलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक संवेदनशील व्यक्तिमत्व – सौ.धनश्री विखे पा. राहुरीत शिवसेनेकडून महिला स्वच्छता दूत यांचा सन्मान  

राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा) :– राहुरी तालुका शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त राहुरी येथे हिंदुहृदय सम्राट  बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी आरोग्य शिबीर व मोफत रक्त तपासणी शिबीर शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांनी आयोजित केले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सिंधुताई विखे पाटील रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री ताई सुजय विखे पाटील या उपस्थित होत्या तर शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा अश्विनी कल्हापुरे,शिवसेना महिला आघाडी ता.प्रमुख वनिता जाधव,वैशाली शेळके उपस्थित होत्या.

या वेळी प्रास्ताविक भाषणात शिवसेना ता.प्रमुख देवेंद्र लांबे म्हणाले कि , महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सर्वसामन्य नागरिकांना लाभ मिळावा या उद्देशाने सर्वरोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तसेच आयुष्यमान भारत योजने अंतर्गत रु.५ लक्ष पर्यंतचा विमा देखील नोंदविण्यात येत आहे.ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही अवास्तव खर्च करण्यात येवू नये जनतेच्या हिताचे कार्यक्रम घेण्याचा सूचना शिवसेना कार्यालयाकडून देण्यात आलेल्या असे देवेंद्र लांबे म्हणाले.

यावेळी अश्विनी कल्हापुरे,आरोग्य अधिकारी डॉ.सोनाली अंत्रे, राजश्री घाडगे यांनी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात सौ.धनश्रीताई विखे पाटील म्हणाल्या कि ,मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे कुटुंब प्रमुख या नात्याने महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत अनेक आरोग्यदायी योजना आमलात आणण्यात आलेल्या आहे.सर्वमहिला भगिनींनी आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी करून घ्यावी.महिलांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर वाढत आहे,महिलांनी आपल्या कुटुंबाबरोबर आपली देखील काळजी घेणे आवश्यक आहे.महिलांनी सकारात्मक विचार केल्यास मानसिक त्रास कमी होण्यास मदत होते.त्यामुळे सामाजिक उपक्रमात महिलांनी उस्फुर्त पणे सहभाग नोंदविणे गरजेचे आहे.महाराष्ट्राला लाभलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक संवेदनशील व्यक्तिमत्व असे सौ.विखे पा.म्हणाल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना तालुका संघटक महेंद्र उगले यांनी केले तर आभार जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब म्हसे यांनी मांडले.

या कार्यक्रमास विद्या अरगडे,ज्योती नालकर,ज्योती वर्पे,पूनम शेंडे, सुवर्णा सप्रे, पल्लवी वामन,प्रियंका जाधव,रोहिणी कोल्हे, अनुपमा सातभाई,वर्षा घाडगे,राणी घाडगे,रुपाली दळे,प्रतिभा घाडगे,श्रुती वर्पे,मनीषा अरगडे.ज्योती अरगडे,मनीषा बोबडे,शिवसेनेचे युवा सेना तालुका प्रमुख वैभव तनपुरे,तालुका संपर्क प्र. अशोक तनपुरे,अनिल आढाव,रोहित नालकर,सारंगधर साठे,वसंत कदम,बाळासाहेब कदम,ज्ञानेश्वर सप्रे,ज्ञानेश्वर जाधव,बाप्पुसाहेब काळे,प्रमोद झिने,अजित ससाणे,मेजर नामदेव वांढेकर,आबासाहेब येवले, अमोल थोरात,भास्कर सांगळे,अशोक शेटे,अक्षय तनपुरे,मधुकर पोपळघट आदी शिवसैनिक नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला आहे.याच विषयास अनुसरून राहुरी शहरातील नगरपालिका महिला स्वच्छता दूत यांच्या स्वच्छतेमुळे शहरात रोगराई कमी होते,त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून साडी देवून सन्मानित करण्यात आले आहे.श्री.देवेंद्र लांबे पाटील (शिवसेना राहुरी तालुका प्रमुख)

सार्वजनिक कार्यक्रम म्हंटल कि नेते कधीच वेळेवर पोहचत नाहीत,परंतु सौ.धनश्रीताई विखे पाटील यांनी कार्यक्रमा साठी उपस्थित राहण्यासाठी दिलेल्या वेळेत उपस्थित राहत वेळेचे शिस्तीचे नियोजन कसे असावे याचा संदेश कार्यक्रमाला आलेल्या महिलांना घालून दिला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!