23.3 C
New York
Saturday, August 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

आ. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जोर्वे ज्येष्ठ महिलांचा सन्मान

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):–काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस संगमनेर तालुक्यात आनंद सोहळा म्हणून साजरा झाला .यावेळी जोर्वे या त्यांच्या गावी गावातील कर्तुत्वान महिला भगिनींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हळदी कुंकवासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.

जोर्वे येथे दत्त मंदिर प्रांगणात कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते जोर्वे गावातील ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समवेत माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. मीनाक्षीताई थोरात, सौ सुनंदाताई दिघे,सौ. मंगलताई काकड, सौ संगीता थोरात, सौ पुनम बर्डे, सौ अरुणा इंगळे, सौ सुरेखा दिघे ,सौ अलका दिघे, आदींसह सुमारे 500 महिला उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थित महिला भगिनींचा शाल सन्मानचिन्ह देऊन ज्योती सत्कार करण्यात आला तर सर्व महिला भगिनींनी हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.

यावेळी बोलताना कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यात नेतृत्व करत आहेत. संगमनेर तालुका हा त्यांनी कुटुंब मानले आहे. जोर्वे हे गाव त्यांची जन्मभूमी असून या गावावर त्यांचे विशेष प्रेम आहे .आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील कष्टकरी आणि कर्तुत्वावर महिलांचा आपण सन्मान करत आहोत.

घरातील प्रत्येक महिलेचा सन्मान झाला पाहिजे. कारण प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीमध्ये महिलांचा मोठा वाटा असतो .ग्रामीण भागामध्ये शेतकरी कुटुंबात महिला खूप कष्ट करत असतात. मात्र त्यांच्या कष्टाला जितके महत्त्व दिले जात नाही .

महिलांनी कष्ट करा, मात्र याबरोबर स्वतःचे आरोग्य सांभाळा, शिक्षण आणि आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचे असून यासाठीच आपण काम करत आहोत.

आमदार बाळासाहेब थोरात हे आपल्या गावचे सुपुत्र आहेत त्यांच्या सुसंस्कृत नेतृत्वाचा आपल्या सर्वांना अभिमान वाटत असून यापुढील काळात आपल्यातील मतभेद विसरून सर्वांनी भक्कमपणे तालुक्याच्या विकासाकरता एकत्र राहू या असे आवाहनही त्यांनी केले.

तर सौ.मीनाक्षीताई थोरात म्हणाले की, डॉ जयश्रीताई थोरात यांनी सातत्याने महिलांच्या आरोग्यासाठी तालुक्यातील शिबिरांचे आयोजन केले आहे त्या स्वतः कॅन्सर तज्ञ असून महिलांमध्ये अनेक आजारांबाबत अज्ञान आहे महिलांनी आपले आजार महिलांजवळ सांगितले पाहिजे आणि हक्काचे ठिकाण म्हणजे डॉ.जयश्रीताई आपल्यासाठी हक्काच्या असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी उपस्थित सर्व महिलांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ सुरेखाताई दिघे यांनी केले सूत्रसंचालन रामदास काकड यांनी केले तर सौ.सुविधाताई काकडे यांनी आभार मानले. यावेळी गावातील शेकडो महिला उपस्थित होत्या .याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाही संपन्न झाली

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!