लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने डिसेंबर 2023 मध्ये कनिष्ठ अभियंता या पदासाठी विविध केंद्रावर 53302 विद्यार्थ्यांची परिक्षा घेन्यात आली होती. या परीक्षेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील रहिवासी कु. कांचन भाऊसाहेब पडवळ या विद्यार्थिनीने ही परीक्षा दिली होती.
गोगलगाव सारख्या अतिशय दुष्काळी भागात आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही कांचनने आपले शिक्षण पूर्ण केले होते. आई वडिलांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन यामुळेच मी हे यश संपादन करू शकले आता भविष्यात या पदावर लोकसेवक म्हणून काम करताना प्रथम सर्व सामांन्य लोकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्या साठीच मी प्रयत्न करणार असल्याचे कु. कांचन हिने सांगितले . सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता पदावर निवड झाल्याबद्दल समाजातील सर्वच क्षेत्रातुन कु. कांचन भाऊसाहेब पडवळ हीचे अभिनंदन केले आहे.