10 C
New York
Sunday, October 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

चासनळी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या शीलाताई चांदगुडे यांची निवड 

कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या शीलाताई शशिकांत चांदगुडे यांची निवड झाली आहे. या निवडीबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी शीलाताई चांदगुडे यांचे अभिनंदन केले आहे.

चासनळीचे माजी उपसरपंच विकास भाऊसाहेब चांदगुडे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.

नूतन उपसरपंच निवडीसाठी नुकतीच ग्रामपंचायत सदस्यांची बैठक सरपंचाच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस माजी उपसरपंच विकास भाऊसाहेब चांदगुडे, ग्रामपंचायत सदस्य विनायक भाऊसाहेब गाडे, हिराबाई भास्कर पवार, प्रीती सुनील गायकवाड, अनिता कैलास पवार आदी उपस्थित होते. उपसरपंच पदाच्या निवडणुकीत उमेदवार कोल्हे गटाच्या शीलाताई शशिकांत चांदगुडे यांना ७ तर काळे गटाचे उमेदवार शिवदत्त प्रल्हाद गाडे यांना ५ मते मिळाली. या निवडणुकीत शीलाताई शशिकांत चांदगुडे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. पटाईत यांनी घोषित केले.

नवनिर्वाचित उपसरपंच शीलाताई चांदगुडे यांचा ग्रामपंचायतमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेश गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव आहेर, चंद्रकांत चांदगुडे, विश्वासराव गाडे, प्रकाश गाडे, किशोर गाडे, कैलासराव चांदगुडे, राहुल चांदगुडे, मनोज गाडे, रवींद्र चांदगुडे, सुनील सुरभैय्या, कैलास धेनक, ज्ञानेश्वर धेनक, गौरव गाडे, शरद पवार, पवन चांदगुडे, भास्कर पवार, कैलास पवार आदींसह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!