राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे आज सरला बेट चे पिठाधिश महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज यांची श्रीपाद भागवत कथा होणार आहे.कथा संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत होणार आहे .
सप्ताह दि.१० फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२३ या काळात होणार आहे त्यामध्ये दि. ११ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर), दि.१२ फेब्रुवारी महंत श्री अर्जुन गिरी महाराज (शिंगी), दि.१३ फेब्रुवारी ह भ प महंत रामगिरी महाराज (वेळी ,पाथर्डी) दि .१४ फेब्रुवारी ह भ प ज्ञानेश्वर माऊली पठाडे कर्जत दिनांक १५ रोजी ह भ प महंत अमृत महाराज जोशी बीड दिनांक १६ फेब्रुवारी ह भ प पांडुरंग महाराज घुले ( देहू) यांचे किर्तन सकाळी ११ते १ या वेळेत होणार आहे.तसेच दुपारी २ ते ३ यावेळेत पुढील प्रवचन होणार आहे. ह. भ. प. शंभू गिरी महाराज ( मानोरी) ह.भ. प. मच्छिंद्र महाराज ढोकणे( उंबरे) ह. भ. प. महेश महाराज खाटेकर (तांदूळवाडी) ह. भ. प. संजय महाराज म्हसे शिलेगाव ह.भ प. किशोर महाराज जाधव (मानोरी) ह. भ
प. डॉ. नेमाने (ब्राह्मणी) यांची प्रवचन रूपे सेवा होणार आहे तसेच दि.१७ या दिवशी ११ ते १ या वेळेत महंत गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल.
तरी या भागवत कथेचा लाभ सर्व पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा अशी आव्हान शिलेगाव व सर्व तालुक्यातील जनतेच्या वतीने करत आहे.




