राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य अविस्मरणीय श्रीराम कथा याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर राम कथेस दिनांक १२/२/२४ ते १८/२/२४ या कालावधीमध्ये प्रारंभ होणार आहे.
शिवबा प्रतिष्ठान वतीने गेल्या ११ वर्षापासून राम कथेचे आयोजन करत आहे. यंदाचे त्यांचे १२ वे वर्ष आहे. या राम कथेस सोमवारपासून प्रारंभ होणार आहे.
सदर कार्यक्रमाची दिनचर्या ही
सोमवार:- ग्रंथ महिमा, भरद्वाज संवाद, सती मोह
मंगळवार:- शिवपार्वती विवाह, नारदजीका अभिमान, प्रतापभानु की कथा
बुधवार:- राम जन्म, बाललीला, धनुषभंग
गुरुवार:- श्री सिताराम विवाह, वन गमन, केवट कथा
शुक्रवार:- भरत चरित्र, सुती लक्षणाचीका प्रेम, सीता हरण, शबरी चरित्र
शनिवार:- श्रीराम हनुमान भेट, वालीवध, लंकादहन सेतुबंध
रविवार:- रावण वध, भरत मिलाप, राज्याभिषेक उत्तरकान्ड, कथाविराम
अशा प्रकारे सहा दिवसाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. याचबरोबर गुरुवर्य ह-भ-प उद्धवजी महाराज मंडलिक नेवासाकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहेत. पूर्ण कथेचे वाचन हे ह-भ-प साध्वी ज्ञानेश्वरीताई बागुल (नाशिक) हे करणार आहेत. या कार्यक्रमासाठी भाविकांची मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक शिवबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ कराळे यांनी केले आहे.




