11 C
New York
Monday, October 27, 2025

Buy now

spot_img
spot_img

संताचे विचार हे समाजासाठी महत्वपूर्ण – सौ.विखे पाटील  प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत १ कोटी रुपयांच्या विविध कामाच्या भुमीपुजन

लोणी दि.१०( जनता आवाज वृत्तसेवा ):-संताचे विचार हे समाजासाठी महत्वपूर्ण ठरत आहेत. वरविनायक सेवा धामच्या माध्यमातून होत असलेले आध्यात्मिक कार्य हे संताचे विचार जपण्या बरोबरचं अध्यात्मिक शक्तीपीठ ठरत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील वरदविनाय सेवा धाम येथे मठाधिपती महंत उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या श्री गणेश जयंतीनिमित्त आयोजित किर्तन महोत्सव आणि प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत १ कोटी रुपयांच्या विविध कामाच्या भुमीपुजन प्रसंगी सौ. विखे पाटील बोलत होत्या. प्रारंभी महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण आणि १ कोटी रुपयांच्या संत निवास परिसर, सुशोभिकरणांचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील होते. यावेळी मंहत उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर, विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलासनाना तांबे, ट्रक वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदूशेठ राठी, बाजार समितीचे माजी सभापती बापूसाहेब आहेर, संजय आहेर, दादासाहेब घोगरे, गोरक्षनाथ तांबे, कल्पना मैड, मिनाक्षी निर्मल, अनिल विखे, कचरु निर्मळ, ह.भ .प. भारत महाराज धावणे,ह.भ.प. दिपक महाराज देशमुख,डाॅ संपतराव वाळुज आदीसह वाविक उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणाल्या, दैव शक्तीमुळे आपण एकत्र आलो आहोतं.येथील अध्यात्मिक वाटचालीमुळे हा परिसर आदर्श ठरत असून या विकास कामामुळे या परिसराच्या वैभवात भर पडले असे सांगितले.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले, मानसिक शांतता आणि आरोग्यासाठी उध्दव महाराज काम करत आहेत. त्याच्या कार्यामुळे या भागात अधात्मिक वारसा जतन होत असल्याने सांगितले.

वरदविनायका   ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विखे परिवारांबरोबरचे सेवाधाम परिवारांचे योगदान महत्वपूर्ण होत आहेत. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सुरू केलेल्या या कार्याची व्याप्ती वाढली असून होत असलेली कामे ही समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून श्री गणेश जयंती निमित्त होत असलेल्या किर्तन महोत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन उध्दव महाराज यांनी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ह.भ.प दिपक महाराज देशमुख यांनी केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!