लोणी दि.१०( जनता आवाज वृत्तसेवा ):-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने डिसेंबर २०२३ मध्ये घेतलेल्या कनिष्ठ अभियंञिकी आणि स्थापत्य अभियांञिकी सहाय्यक परिक्षेत लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची निवड झाली असून बहुराष्ट्रीय कंपन्याबरोबरचं शासकीय सेवेत मुलांना नोकरी देण्यात हे महाविद्यालय अव्वल स्थानावर राहीले आहे.
सिव्हील विभागातील अश्वीन संजय आहेर,निशांत उल्हास लहाने यांची कनिष्ठ अभियंता तर संदिप गंगाधर मानेटवाड,कु.सोनाली इंद्रभान चोळके,कु.अंजली अर्जुन गडेराव यांची स्थापत्य अभियंता सहाय्यक म्हणून निवड झाल्याची माहीती प्राचार्य डाॅ.संजय गुल्हाने यांनी दिली.
प्रवरेच्या माध्यमातून शिक्षणासोबतचं विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करीअर करता यावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शाखाली वेळोवेळी संवाद कौशल्य, मुलाखत तंत्र, व्यक्तीमहत्व विकास यासह बदलत्या अभियांत्रिकीतील तंत्रज्ञानाची माहीती दिली जाते. ग्रामीण विद्यार्थी हा सर्वच क्षेत्रात आघाडीवर असतो.हेच या निवडीतून सिध्द होत आहे यासासाठी या विभागाचे प्रमुख डाॅ.प्रमोद कोळसे आणि प्रा.लक्ष्मण लहामगे यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. आण्णासाहेब वराडे, संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. मनोज परजने सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्रवरेत शिक्षणासोबत विविध उपक्रम, इंडस्ट्रियल व्हिजिट्स व इंटर्नशिप याद्वारे परिपुर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न होत असतो.प्रक्षेण भेटी,स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन,वेळोवेळी होणारे परिसंवाद,चर्चासञ यामुळे हे यश आम्हा मुलांसाठी महत्वपुर्ण आहे.
– ——- सोनाली चोळके




