spot_img
spot_img

शिर्डी कोपरगाव इंटरचेंज टोलनाक्यावर टायर तपासणी केंद्रचा शुभारंभ

कोपरगाव( जनता आवाज

वृत्तसेवा ):- हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने शिर्डी व नागपूर अशा दोन ठिकाणी टायर तपासणी केंद्र उभारणी करण्यात आलेली आहे

समृद्धी महामार्ग शिर्डी कोपरगाव इंटरचेंज येथील टोल नाक्यावर आज शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता परिवहन आयुक्त च्या हस्ते या केंद्राचा उद्घाटन करण्यात आले आहे. या टायर तपासणी केंद्राच्या माध्यमातून वाहनांची मोफत तपासणी केली जाणार आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त वाहनधारकांनी लाभ घ्यावा असे आव्हान अहमदनगर उपप्राध्यक्षिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा शिर्डी ते नागपूर व दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर असा वाहतुकी साठी सुरू झालेला आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची उद्घाटन झाल्यानंतर बऱ्याच प्रमाणात अपघात झाली. याचे मूळकारण महामार्गावर वाहन चालविताना टायर अयोग्य गुणवत्तेचा, वेग मर्यादा न पाळणे अशी कारणे पुढे आली आहे. त्यामुळे वांधारकांना सुरक्षित प्रवास करता यावा या उद्देशाने शिर्डी कोपरगाव इंटरचेंज येथील टोल नाक्यावर टायर तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
 या सुविधेचा जास्तीत जास्त वाहनधारकांनी लाभ घ्यावा
– उर्मिला पवार ( अहमदनगर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी )
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!