श्रीरामपूर(जनताआवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर शहरातील गोंधवणी रोड परिसरात एका तरुणावर चॉपरने सपासप वार करत त्याची निर्घुणपणे हत्या करण्यात आली.
काहीतरी किरकोळ कारणावरून तनवीर शहा, रुपेश शिंदे, सुनील देवकर यांची कुरबुर झाली. नंतर त्यांचे भांडणामध्ये रूपांतर झाले. आदल्या दिवशी झालेल्या भांडणाचा राग धरून दुसऱ्या दिवशी पहाटे गोंधवणी रोड परिसरात तन्वीर शहा थांबलेला असता त्या ठिकाणी रुपेश शिंदे आणि सुनील देवकर आले. त्यांनी तनवीर शहा याला अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळचे रूपांतर नंतर हाणामारी झाली त्यावेळी तनवीर शहा याच्यावर चॉपरने 8 ते 10 वार करण्यात आले.



