राहाता( जनता आवाज वृत्तसेवा):-संतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र साकुरी मध्ये पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन बघावयास मिळाले आहे याबाबत माहिती अशी की कन्याकुमारी सती गोदावरी माताजी यांना श्री क्षेत्र साकुरी मध्ये येऊन 100 वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्ताने दि 16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधी मध्ये साकुरी येथील श्री उपासनी कन्याकुमारी आश्रम मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याच कार्यक्रमाचे निमंत्रण साकुरी गावातील सर्व ग्रामदैवताना आज देण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर साकुरी येथील मज्जीद मध्ये सुद्धा साकुरी आश्रम मधील कन्या वृंद यांचे कडून साकुरी येथील मुस्लिम बांधवांच्या मज्जीद मध्ये जाऊन विधिवत पूजा करून मुस्लिम बांधवाना सुद्धा या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले त्यामुळे साकुरी मध्ये पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन बघायला मिळाले यावेळी साकुरी आश्रमातील कन्यावृंद माधविताई गुरू गोदावरी,ज्योती ताई गुरू गोदावरी,स्वराली ताई गुरू गोदावरी,पिंटू कुलकर्णी,राणी कुलकर्णी, अनिल बावके,अशोक थोरात,भागवत लुटे आदींसह साकुरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते