नगर (जनता आवाज वृत्तसेवा):- अहमदनगरमध्ये स्पेशल ऑलिम्पिक भारत अहमदनगर यांच्या मार्फत दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी जिल्हास्तरीय स्पर्धेतून १० विद्याथ्यांची राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.
दि. ३० जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२४ दरम्यान स्पेशल ओलंपिक भारत राज्यस्तरीय चैम्पियनशिप स्पर्धा ही नागपूर येथिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ येथे पार पडल्या असून या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण, रोप्य व 2 रजत असे एकून 11 पदकांची कमाई केली. त्यामध्ये वयोगट २२ ते २९ चि. बाबू यांनी ५० मी. व २१ मी फ्रीस्टाईल स्विमिंग या क्रीडा प्रकारात, प्रथम क्रमांक मिळवून 2 सुवर्ण पदकांची कमाई केली. चि.जयसिंग यादव यांनी वयोगट २२ ते २९ मध्ये २०० मी. धावणे या कीडा प्रकारात प्रथम कमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले. चि. दिपक पावरा याने १९ ते २१ या वयोगटात १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक मिळविले. तसेच त्याने लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदकाची कमाई केली. चि. वैभव जाधव यांनी २२ ते २९, या वयोगटात २०० मी. धावणे या कीडा प्रकारात दद्वितीय क्रमाक मिळवून रोप्य पदकाची कमाई केली. चि. कृष्णा याने १६ ते १८ या वयोगटात १०० मी. धावणे या कीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवून रजत पदकांची कमाई केली. चि. दिपेंद्र ढमाले याने २२ ते २९ या वयोगटातील २५ फ्रीस्टाईल जलतरण या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून रोप्य पदकाचा मानकरी कुमारी मादुरे महंडुळे हिने २२ ते २९ या वयोगटातील १०० मी. धावणे या क्रीडा प्रकारामध्ये दद्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदकाची मानकरी ठरली. चि. अजय काकडे याने २२ ते २९ या वयोगटातील २०० मी. धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून रोप्य पदकाचा मानकरी ठरला. चि. रज्जाक मोच्चू याने १६ ते २९ या वयोगटात २०० मी. धावणे या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळवून रजत पदकाचा मान मिळवला. कुमारी प्रेरणा भाटिया हिने १०० मी. धावणे स्पर्धेत चौचा कमांक मिळवून सहभाग नांदवला. या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, स्विमिंग, फुटबॉल, हॉलीबॉल, यांसारख्या विविध क्रीडा स्पर्धा होत्या. या स्पर्धेत एकूण 36 जिल्ह्यांतील एकूण ६०० विद्याथ्यांनी व १५० प्रशिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूचे बक्षीस वितरण करण्यासाठी
डॉ. सौ. मेधा सोमय्या (अध्यक्ष स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र), मा. श्री. डॉ. सिद्धार्थ गायकवाड (प्रादेशिक आयुक्त समाजकल्याण विभाग नागपूर), मा. श्री. भगवान तलवारे (क्षेत्र संचालक महाराष्ट्र), मा. श्री. जितेंद्र ढोले (क्रीडा संचालक SOB), मा. श्री. उदय गोजमगुंडे (संचालक) आदि मान्यवर उपस्थित होते.
अहमदनगर येथील सर्व विजेत्या खेळाडूचे दक्षिण अहमदनगरचे खासदार मा. डॉ. सुजय विखे पाटील, तसेच मा. श्री. राधाकिसन देवदे (समाज कल्याण अधिकारी अहमदनगर) सौ. धनश्रीताई विखे पाटील (अध्यक्ष स्पेशल ऑलिम्पिक भारत अहमदनगर) व मा. श्री. डॉ. अभिजीत दिवटे (उपाध्यक्ष स्पेशल ऑलिम्पिक भारत अहमदनगर), यांनी विद्याथ्र्याचे अभिनंदन केले व राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शन करणारे मा. श्री. डॉ. दिपक अनाप, मा. श्री. डॉ. अभिजीत मेरेकर, व मा. श्री. डॉ. किरण आहेर यांनीदेखील विद्याथ्यांचे अभिनंदन केले. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
तसेच या विद्याथ्यांना घडवण्यासाठी या स्पर्धक खेळाडून त्यांचे क्रीडा शिक्षक प्रशिक्षक श्री संदीप राहणे सर, श्री हर्षल वाणी, श्री. अमोल चौधरी, श्री शिरसाट सर, श्री दत्तात्रेय कोलते सर, सौ. सुशीला आधव मॅडम इ. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचेही खेळाडूचे अभिनंदन केले. या सर्व यशस्वी विवास्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.