कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा) :- नगर – मनमाड महामार्गावरून चाललेली मालवाहतूक ट्रक स्टेअरिंग लॉक झाल्याने दुसऱ्या ट्रकवर आदळली. राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे हा अपघात घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे बिरोबा मंदिरासमोर ही घटना घडली. कोपरगाव कडून नगरच्या दिशेने लसूण घेऊन चाललेला मालवाहतूक ट्रक ( क्रमांक – आर. जे. ०५ जीसी ८७८४ ) स्टेअरिंग लॉक झाल्याने दुसऱ्या बाजूने कोपरगावच्या दिशेने कलरचे डबे घेऊन चाललेल्या मालवाहतूक ट्रकवर ( क्रमांक – के. ए. १० ए २३४५ ) जाऊन आदळला. यामध्ये दोन्ही ट्रकच्या समोरील भागाचे नुकसान झाले. सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.




