पारनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ): – पारनेर येथील शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर एका तरुणाने गावठी कट्ट्याने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला मात्र कट्ट्यातून गोळी सुटली नसल्याने पठारे बालबाल बचावले असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पारनेर येथे गुरुवारी दि. १५ रोजी सकाळी १० : ३० च्या सुमारास युवराज पठारे हॉटेल दिग्विजय येथे सहकार्यांसोबत चर्चा करत असताना तेथे आरोपी यश बाळासाहेब जाधव वय १७ राहणार रांजणगाव मशीद ता पारनेर यांनी येऊन युवराज पठारे यांच्यावर गावठी कट्टा रोखून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला मात्र कट्ट्याचा लॉक उघडला नसल्याने युवराज पठारे बचावले त्यानंतर आरोपी जाधव यांनी चाकूने पठारे यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला पण झटापटीत त्याला बाजूला असणाऱ्या भरत गट व इतर लोकांनी पकडले पोलीस येईपर्यंत आरोपीस बेदम चोप दिला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू असून घटनेचे कारण अद्याप समजले नाही .घटनेचा तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर करत आहेत.