लोणी दि.१५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी येथील केमिकल अभियांत्रिकीच्या चालू शैक्षणिक वर्ष २०२३-२४ विभागाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची विविध नामांकित आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये २८ विद्यार्थ्याची निवड झाली आहे अशी माहीती डाॅ.संजय गुल्हाने यांनी दिली.
यामध्ये मेक्लाईड फार्मासिटिकल लिमिटेड मध्ये १९ विद्यार्थी, गुजरात अंबुजा कंपनीत पाच विद्यार्थी, जे . एन . के इंडस्ट्री मध्ये दोन विद्यार्थी, अशा एकूण २५ विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे. येणाऱ्या महिन्यामध्ये प्राज इंडस्ट्री – पुणे वरली इंजिनीरिंग – मुंबई , टोयो इंजिनीरिंग -मुंबई , क्रॅब अँड टूर – पुणे , मौज इंडस्ट्री – पुणे , सिप्ला फार्मास्युटिकल – पुणे ,अशा अजून बऱ्याच बहुराष्ट्रीय कंपनी प्लेसमेंट ड्राईव्ह घेणे अपेक्षित आहे.असे केमिकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुनील मिसाळ यांनी सांगितले.
प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागाला नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन (एन बी. ए) कडून गुणवत्ता आणि निकाल यांच्या निकषांवर २०२३ मध्ये मानांकन देण्यात आले आहे.एनबीए प्रोग्राममधून पदवीधर होण्याचे अनेक लाभ विद्यार्थ्यांना मिळतात. मान्यता संस्थांना त्यांच्याद्वारे प्रदान केलेल्या शिक्षणाची गुणवत्ता सतत सुधारण्यासाठी आणि वाढविण्यासाठी प्रोत्साहित करते . आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असल्याने, या मान्यता प्राप्त पदवीना अनेक बहुराष्ट्रीय व मान्यता प्राप्त कंपन्यांमध्ये प्राधान्य मिळून विद्यार्थ्यांना रोजगार आणि व्यवसाय यांच्या संधी प्राप्त होतात.महाविद्यालयामध्ये आयोजित होणाऱ्या विविध औद्योगिक व व्यावसायिक विषयांवरएक्सपर्ट लेक्चर, गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांना ईनटर्नशिप द्वारे कंपनीमध्ये काम करण्याची व प्रशिक्षण मिळवण्याची संधी, इंडस्ट्रियल व्हिजिट, प्लेसमेंट प्रक्रिया सुलभ होण्यासाठी व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी मॉक इंटरव्यूव व प्री प्लेसमेंट , प्रोजेक्ट कॉम्पिटिशन इत्यादी उपक्रमांमध्ये माजी विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
महाविद्यालयातील केमिकल विभागाने आयआयटी मुंबई या संस्थेसोबत संलग्नता करार केला असून फॉस या उपक्रमाच्या अंतर्गत फ्री ऑनलाइन कोर्सेस ची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे.
उत्कृष्ट निकालाची परंपरा, माजी विद्यार्थ्यांचा सहयोग, अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन , लॅब डेव्हलपमेंट साठी ए आय सी टी ई कडून मिळालेले प्रोजेक्ट अनुदान आणि विविध नामांकित कंपन्यांसोबत केलेल्या संलग्नता करार यामुळे केमिकल इंजिनिअरिंग विभागाने मागील तीन वर्षात शंभर प्लेसमेंट ची परंपरा कायम राखली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट होण्यासाठी केमिकल विभागाचे सर्व स्टाफ मेंबर्स तसेच प्रवरा प्लेसमेंट चे समन्वयक प्रा. मनोज परजणे, प्लेसमेंट कॉर्डिनेटर्स डॉ. अण्णासाहेब वराडे, प्रा. राजेंद्र निंबाळकर व प्रा. नितीन चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या या प्लेसमेंट बाबत संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील सहसचिव भारत घोगरे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी अभिनंदन केले आहे.