3.1 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

spot_img
spot_img

डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींना सायकल वाटप विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):– काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सबलीकरणाचे काम करणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या वतीने कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील अत्यंत गरीब व गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले आहे.

यशोधन कार्यालय येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचनताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील पाच विद्यार्थिनींना सायकलचे वाटप व इतर विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले .यावेळी समवेत सौ.शरयूताई देशमुख ,सौ अर्चनाताई बालोडे, सौ शांताबाई खैरे, सौ बेबीताई थोरात, निशाताई कोकणे ,सौ कोमल उगले, एकविराच्या डॉ वृषाली साबळे ,सुरभी मोरे, प्राजक्ता घुले, शर्मिला हांडे, तृष्णा आवटी, शिवानी वाघ, डॉ सुरभी असोपा, शिला पंजाबी, सौ ज्योती थोरात, मुख्याधिकारी श्रीराम कु-हे, प्रा.बाबा खरात आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शेळकेवाडी येथील इ. ७ वी मधील तालुका स्तरावरील उत्तम खेळाडू असलेली तृप्ती सखाराम मधे, गरीब परंतु अत्यंत हुशार विद्यार्थिनी असलेली वरझडी येथील इयत्ता ६ वी मधील अमृता विकास भडांगे, दररोज शाळेसाठी पाच किलोमीटर पायी चालणारी सुकेवाडी येथील धनश्री गणेश चव्हाण, देवगाव येथे तीन किलोमीटर पायी चालत येणारी परंतु शाळेत हुशार असलेली करीना पृथ्वी गौतम, आणि करोली येथे पाच किलोमीटर अंतर चालत शाळेसाठी येणारी इयत्ता पाचवी मधील आम्रपाली संजय पवार यांना सायकली देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना सौ कांचनताई थोरात म्हणाल्या की, एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून मागील पाच वर्ष विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे .यामध्ये गणपतीचे निर्माल्य गोळा करणे, दीपावली मध्ये स्वस्त दरामध्ये स्टॉल लावणे, आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे ,महिलांची हिमोग्लोबिन तपासणी, मुलींकरता १००  मोफत सायकलचे वाटप, विद्यार्थिनींसाठी वहयांचे वाटप असे सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. डॉ जयश्रीताई थोरात या वडिलांप्रमाणे सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय असून महिलांच्या आरोग्यासाठी त्यांनी केलेले काम नक्कीच ग्रामीण भागातील महिलांसाठी उपयोगी ठरत असल्याचे ही त्या म्हणाल्या.

तर श्रीराम कु-हे म्हणाले की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समाजकार्याचा वारसा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी जपला असून त्यांनी सातत्याने महिलांच्या आरोग्यासाठी काम केले आहे .संगमनेर तालुक्यातील प्रत्येक महिलेसाठी डॉ. जयश्रीताई या हक्काच्या ठिकाणी झाले आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी सौ शरयू ताई देशमुख, प्रा बाबा खरात, सौ अर्चनाताई बलोडे अमृता भडांगे, करीना गौतम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला हांडे यांनी केले तर प्राजक्ता घुले यांनी आभार मानले.यावेळी एकविरा फाउंडेशनच्या विविध सदस्या महिला व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!