टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ):- टाकळीभानसह परिसराला वरदान ठरलेल्या टाकळीभान टेलटँक निर्मितीत स्व. अण्णासाहेब पटारे यांचा सिंहाचा वाटा आहे असे प्रतीपादन अशोक कारखान्याचे कारेगाव भाग संचालक शिवाजीराव शिंदे यांनी केले.
टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व कै. अण्णासाहेब पटारे कनिष्ठ महाविद्यालयात स्व. अण्णासाहेब पटारे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी जेष्ठ नागरिक रामकृष्ण मैड व अशोक कारखान्याचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव साळुंके यांच्या हस्ते स्व. अण्णासाहेब पटारे यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलतांना शिंदे म्हणाले की, सहकार, शेती, शिक्षण व प्रगत टाकळीभानचे शिल्पकार म्हणूनअण्णासाहेबांना ओळखले जाते टाकळीभानच्या विकासात मोलाचा वाटा असणारे स्व. अण्णासाहेब पटारे पाटील हे खऱ्या अर्थाने “विकास पुरुष” ठरले. त्यांनी परिसरातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक- युवती व तरुण- तरुणींना त्यांच्या क्षेत्रातील निगडित उद्योग व्यवसायासाठी चालना दिली. तसेच शेती क्षेत्रा बरोबरच सहकार क्षेत्राचे बीज त्यांनी गावात रोवली व त्यांनी अशोक कारखान्याचे अध्यक्षपदही भूषविले होते.टाकळीभान गावाला वरदान लाभलेल्या “टेलटँक” निर्मितीसाठी त्यांनी सिंहाचा वाटा असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी रयतचे बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे, कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन दत्तात्रय नाईक, माजी सरपंच मंजाबापू थोरात, बाजार समितीचे संचालक मयुर पटारे, कारखान्याचे संचालक यशवंत रणनवरे, सेवा संस्थेचे माजी चेअरमन राहुल पटारे, मधुकर कोकणे, लोकसेवाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाघुले, ग्रा.पं सदस्य सुनील बोडखे, दत्तात्रय पटारे, भाऊसाहेब पटारे , महेश लेलकर, शिवाजी पटारे, बाबासाहेब पटारे, पर्यवेक्षक बनसोडे, पाचपिंड आदी मान्यवर उपस्थित होते.
स्व. अण्णासाहेब पटारे यांचा नातू असल्याचा अभिमान आहे. त्यांचा सहवास आम्हाला लाभला नाही मात्र त्यांचा सुसंस्कृत वारसा चालविण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहील. व पुढच्या वर्षी १ जानेवारीला त्यांच्या जयंती निमित्त मोठ्या उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल.
(मयुर पटारे, संचालक कृ.उ.बा.स श्रीरामपूर तथा ग्रा.पं सदस्य टाकळीभान.)




