spot_img
spot_img

खरेदी विक्री संघ उर्जितावस्थेत आणुन मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवु – खासदार डाॅ.सुजय विखे पाटील

टाकळी ढोकेश्वर (जनता आवाज वृत्तसेवा):-माजी खासदार कै.बाळासाहेब विखे पाटील त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आता खासदार म्हणुन माझ्यावर जो विश्वास पारनेरकर दाखवत आहेत सार्थ ठरवुन खरेदी विक्री संघ उर्जितावस्थेत आणुन वेगळ्या उंचीवर नेणार असल्याचे खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
लोणी प्रवारा(ता.राहता) येथील जनसेवा कार्यालयात पारनेर तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत विखे गटाने सर्व जागा जिंकून एकहाती वर्चस्व प्रस्थापित केल्याबद्दल १५ उमेदवार व पॅनल प्रमुखांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी विजयी उमेदवारांना खासदार डाॅ.विखे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी राहुल शिंदे पाटील,विश्वनाथ कोरडे,
सचिन वराळ पाटील,सुनील थोरात,विकास रोहोकले,दिनेश बाबर,दत्ता पवार,पंकज कारखिले, शिवाजी खिलारी, संदीप सालके,बाळासाहेब रेपाळे,मनोज मुंगसे,सुभाष दुधाडे,वसंत चौधरी, गोरख पठारे,बाबासाहेब चव्हाण यांच्या सह विजयी उमेदवार उपस्थित होते.
खासदार डाॅ.विखे म्हणाले,सत्तेच्या माध्यमातून खरेदी विक्री संघाला विविध योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करू तालुका भाजपा व शिवसेना यांनी एकत्रितपणे प्रचार यंत्रणा राबवुन चांगले यश मिळविले आहे.
 लोकप्रतिनिधींकडून खरेदी विक्री संघ निवडणुक प्रतिष्ठेची केली होती ते स्वतः व पक्षाचे पदधिकारी मतदान केंद्रावर तळ ठोकून होते मतदान पार पडल्यानंतर विजयाचे दावे करत होते आम्ही मात्र प्रचार यंत्रणेवर जोर देत शांततेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि सर्व उमेदवार एकहाती निवडणुन आले आहेत – 
राहुल शिंदे पाटील – (युवा नेते पारनेर)
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!