3.8 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

शरद पवारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार

दिल्ली (जनता आवाज वृत्तसेवा ):-अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या शरद पवारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या, सोमवारी सुनावणी होणार आहे.

ही सुनावणी न्या. सूर्यकांत, न्या. दीपंकर दत्ता आणि न्‍या. केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी 16 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून व्हीप जारी केला जाऊ शकतो, असे सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेची तातडीने यादी करण्याचे मान्य केले होते.

सिंघवी म्हणाले होते की, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या १५ फेब्रुवारीच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर या याचिकेची तातडीने यादी करणे आवश्यक आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि राज्यघटनेतील पक्षांतरविरोधी तरतुदींचा वापर अंतर्गत असंतोष दडपण्यासाठी करता येणार नाही, असे नार्वेकर म्हणाले.

तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने ६ फेब्रुवारी रोजी अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचे जाहीर केले आणि गटाला पक्षाचे ‘घड्याळ’ चिन्हही दिले.आता विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावर शरद पवार गट पक्षाच्या व्हिपखाली असेल.

आमची केस उद्धव ठाकरेंपेक्षा वाईट आहे, कारण आम्हाला कोणतेही पर्यायी निवडणूक चिन्हही देण्यात आलेले नाही, असे ज्येष्ठ वकील सिंघवी म्हणाले होते.दुसरीकडे अजित पवार गटाने अधिवक्ता अभिकल्प प्रताप सिंग यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे.

दरम्‍यान, महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यामुळे उद्या होणा-या सुनावणीत सर्वोच्‍च न्‍यायालय कोणत निर्णय देईल, याकडे संपूर्ण राज्‍याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!