spot_img
spot_img

मुरकुटे विद्यालयाचे एसएससी परीक्षेत नेत्रदीपक यश

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-काशिनाथ पाटील मुरकुटे विद्यालय कमलपुरचा इयत्ता दहावी मार्च 2023 च्या परीक्षेचा निकाल 93.75 टक्के लागला.

असून कुमारी सायली किशोर उदरभरे ही 94.20 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली.तर गौरव किशोर गोरे हा 88.40 टक्के गुण मिळवून  द्वितीय, ओंकार पोपट मेघळे  हा 86 टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, तंटामुक्तीचे अध्यक्ष मा.भास्करराव मुरकुटे, सरपंच सचिन मुरकुटे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी  शुभेच्छा दिल्या. 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!