spot_img
spot_img

औद्योगिक विकासातून शिर्डी हे रोजगाराचे मुख्य केंद्र- महसूल पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी दि.४(जनता आवाज वृत्तसेवा) :- शेती महामंडळाच्या जागांचा जनहितासाठी उपयोग करण्यास राज्य सरकारने दिलेली मंजूरी ही शिर्डी आणि परीसराच्या विकासासाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे.असलेल्या पायाभूत सुविधांचा उपयोग करून औद्योगिक विकासातून शिर्डी हे रोजगाराचे मुख्य केंद्र करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन महसूल पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांनी शिर्डी शहरातील विविध भागातील नागरीकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.बहुतांशी प्रश्नाच्या संदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने सूचना करून प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना दिल्या.

शहरातील मोजणी कार्यालयातून येत असलेल्या अडचणीची दखल घेवून या विभागातील समस्या कायमस्वरूपी सुटावी याकरीता वरीष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत कॅम्पचे आयोजन करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.शिर्डी शहराच्या विकासासाठी कधीही आपण निधीची कमतरता भासू दिली नाही.भविष्यात या शहराचा विकास अधिक वेगाने आपल्याला करायचा आहे.यासाठी शिर्डी सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी राज्य सरकारने ५२ कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता करुन देण्याचे मान्य केले असून याचे काम लवकर सुरू होणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
श्री साईबाबांची महती खूप मोठी आहे.साईबांबाच्या जीवनावरती एक थिमपार्क उभारण्याचा आपला प्रयत्न असून यासाठी आता शेती महामंडळाच्या जागेचा उपयोग करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.राज्य सरकराने शेती महामंडळाच्या जमीनी आता जनहिताचे प्रकल्प उभारण्यासाठी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करून,या जमीनीवर आयटी पार्क लाॅजेस्टिक पार्क उभारून रोजगारच्या संधी निर्माण करण्यावर आपला भर असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
समृध्दी महामार्ग आणि विमानतळ शिर्डीच्या विकासातील जमेच्या बाजू आहेत.यामुळेच आता औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या कंपन्या येण्यास उत्सुक आहेत.यातून शिर्डी आणि परीसरात रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे सांगतानाच भविष्यात शिर्डी हे औद्योगिक विकासाचे मोठे केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्य सरकार राबवत असलेल्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी सरकारच्या यंत्रणेतून होत आहे.शहरात संजय गांधी निराधार योजना घरकुल योजना अधिक काटेकोरपणे राबवली जावी यासाठी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करण्याची सूचना विखै पाटील यांनी दिल्या.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास कोते अभय शेळके प्रतापराव जगताप कमलाकर कोते सभापती ज्ञानेश्वर गोंदकर प्रांताधिकारी माणिक आहेर तहसिलदार अमोल मोरे मुख्याधिकारी सतिष दिघे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!