पारनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- छ्त्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव पारनेर शहरात जल्लोषात साजरी करण्यात आली. शहरातील बसस्थानक जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, खालची वेस, मिलन चौक, शहरातील मंडळातील कार्यकर्त्यांनी रायगड वरुन आणलेल्या ज्योतीचे शहरात चौका चौकात स्वागत कऱण्यात आले. शहरातील शासकीय, निमशासकीय, पारनेर तहसील कार्यालय, पारनेर पंचायत समिती, पारनेर नगर पंचायत, विविध शैक्षणिक संस्था, बँका, कॉलेज, या ठिकाणी शिव जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी शहरातील राजकिय पक्ष, सामजिक कार्यकर्ते, विवीध संघटनांचे पदाधिकारी यांनी शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली होती. यावेळी पारनेर शहरात शिवमय वातावरण दिसून येत होते. अश्वरुढ शिवाजी महाराज यांचे प्रतीकात्मक दर्शन पारनेर करणा जास्त भावले. मावळ्यांची वेशभूषेने शहरातील नागरिकांची वाहवा मिळवली. तर न्यू इंग्लिश स्कूल मधील कला शिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांनी कलर खडूने रेखाटलेले शिवाजी महाराज यांचे तैलचित्र सोशल मीडियावर चांगलेच गाजले.
शहरातील डी के औटी कॉलेज ऑफ फार्मसी, पारनेर मध्ये शिवजयंती उत्सवात साजरी करण्यात आली. पारनेर येथील डी.के.औटी फार्मसी कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी दि १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८.०० वा. स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती सोहळा विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. डी आणि बी फार्मसी प्रथम व द्विीतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने पहाटे शिवनेरी वरुन पाई जाऊन शिवज्योत आणून कॉलेजमध्ये प्रथम शिवज्योत चे पूजन करण्यात आले. त्यानंतर कॉलेजचे सचिव डॉ. परेश औटी यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महारांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुश्पहार घालून महाराजांची आरती घेण्यात आली. त्यावेळेस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महारांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली तसेच शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
त्यावळेस कॉलेजचे सचिव डॉ. परेश औटी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांस श्री छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त स्वराज्याचे संस्थापक नव्हते तर राज्य स्थापन करुन राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे खरे महानायक होते. तसेच विद्यार्थांनी शिवाजी महाराज्यांच्या विचारांना प्राध्यान्य देउन एक तरी गुण आत्मसात करावा असे आवाहन विद्यार्थांस केले. तसेच कार्यक्रमाची सांगता कॉलेजमधील प्राध्यपकांनी बाळ शिवाजी महाराजांचा पाळणा गाउन करण्यात आली. त्यावळेस सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व डी व बी फार्मसीचे विद्यार्थी उपस्थितीत होते.