टाकळीभान (जनता आवाज वृत्तसेवा):टाकळीभान येथील वटपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेला वटपौर्णिमा 2023 हा कार्यक्रम नुकताच पार पडला. लोकसेवा महाविकास आघाडी आणि ग्रामपंचायत टाकळीभानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका आणि जिद्द सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजुश्री मुरकुटे होत्या. या प्रसंगी बोलताना टाकळीभान येथील महिलांचे कौतुक करत त्या म्हणाल्या की महिला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेल्या तरीही आपली परंपरा विसरत नाही.
अगदी कुठल्याही व्यवसायात कितीही व्यस्त असल्या तरी मराठमोळे सण आणि परंपरा यांचा विसर पडू देत नाही. टाकळीभान येथील महिला देखील याबाबत मागे नाही. महादेव मंदिर परिसर इथे आयोजित या कार्यक्रमात बहुतांश महिलांनी उत्साहात भाग घेतला. या प्रसंगी हिराबाई साळुंके, कमलबाई बनकर, सरपंच अर्चना रणनवरे, स्नेहल पटारे, अर्चना पवार, कविता रणनवरे, नंदाताई मगर, शांताबाई नाईक हे प्रमुख उपस्थितीत होते.




Total Users : 629138